महाविकास आघाडीचा अख्खा वाडा उद्ध्वस्त, राजू शेट्टींची टीका

raju shetty

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. काल(बुधवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी जनतेला संबोधित केले. त्यानंतर ठाकरेंचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात आलं. दरम्यान, महाविकास आघाडीचा अख्खा वाडा उद्धवस्त झाल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

महाविकास आघाडीच्या काही सत्तापिपासू नेत्यांनी स्वाभिमानी आणि शेकापच्या झोपडीतील आड्याचा एक बांबू उपसला. पण ईडीच्या वादळात याच नेत्यांमुळे महाविकास आघाडीचा अख्खा वाडा उद्धवस्त झाला, अशी टिकात्मक पोस्ट राजू शेट्टी यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली आहे. शेट्टी यांनी यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव घेत राज्यातील सत्तापिपासू नेते असा उल्लेख करत राजू शेट्टींनी महाविकास आघाडीवर टीका केली होती.

महाराष्ट्राच्या विधानसभेची नगरपालिका झालेली बघून लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनाला वेद होत आहेत. राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या सत्तापिपासू वृत्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मत शेट्टींनी व्यक्त केलं होतं.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे मुंबईत येणार असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात त्यांची चर्चा होत आहे. त्याचप्रमाणे अनेकांकडून टीका देखील केली जात आहे.


हेही वाचा : विधानसभेत विरोधी पक्षनेते कोण? अजित पवार की जयंत पाटील?