घरमहाराष्ट्रखोतांकडे स्वच्छ हात आणि स्वच्छ चारित्र्य नाही; राजू शेट्टींचा सदाभाऊंवर घणाघात

खोतांकडे स्वच्छ हात आणि स्वच्छ चारित्र्य नाही; राजू शेट्टींचा सदाभाऊंवर घणाघात

Subscribe

संघटनेतून हाकललेल्यांना पुन्हा सोबत घेणार नाही

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहे त्यांच्याबरोबर मी काम करतो, त्यांच्याकडे हे दोन्हीही नाही. संघटनेतून हाकललेल्यांना पुन्हा सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही, अशा कठोर शब्दांत राजू शेट्टी यांनी सदाभाऊंवर घणाघात केला. राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू नसतो म्हणत राजू शेट्टी यांचा हात पुन्हा धरण्याचे संकेत सदाभाऊ खोत यांनी दिले होते. याला राजू शेट्टी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

“मी गेली ३५ वर्षे चळवळीत काम करत आहे. मला स्वच्छ हाताच्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या माणसासोबत काम करण्याची सवय आहे. ज्यांना समिती नेमून संघटनेतून हाकलून लावले आहे त्यांना परत घेण्याचा प्रश्नच येत नाही. सदाभाऊ खोत यांना हाकलण्याचे मूळ कारणच हे होते की ते स्वच्छ हात आणि स्वच्छ चारित्र्य या आमच्या निकषांमध्ये बसत नव्हते,” असे राजू शेट्टी म्हणाले. एवढ्यावरच न थांबता राजू शेट्टी यांनी सदाभाऊंचे अश्रू हे मगरीचे अश्रू म्हटले. “शेतकऱ्यांबाबत पुतण्या-मावशीचे प्रेम अनेक जण दाखवतात. पण त्यात गांभीर्य किती आहे हे बघावे लागेल. म्हणून मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या खोतांबद्दल आम्हाला काहीही वाटण्याचे कारण नाही. आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमच्या मार्गाने चाललो आहोत आणि जात राहू. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला असेल म्हणूनच कदाचित ते आमच्याप्रती प्रेम भावना व्यक्त करीत आहेत. पण यांच्या अशा मायावी बोलण्याला कोणी फसणार नाही,” अशा स्पष्ट शब्दांत राजू शेट्टी यांनी सुनावले.

- Advertisement -

सदाभाऊ खोत यांना खरोखरच पश्चाताप होत असेल तर त्यांनी ज्या गोरगरीब शेतकऱ्यांचे कडकनाथ घोटाळ्यात पैसे बुडालेत, त्यांची दिवाळी वाईट झालेली आहे. त्यांचे पैसे परत करावेत. त्यानंतरच त्यांच्या मागणीवर जरा विचार करता येईल, अशी रोखठोक भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -