घरताज्या घडामोडीप. महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग; राजू शेट्टी राष्ट्रवादीच्या कोट्यातून परिषदेवर!

प. महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग; राजू शेट्टी राष्ट्रवादीच्या कोट्यातून परिषदेवर!

Subscribe

बारामती आणि राजू शेट्टी यांचे संबंध भूतकाळात काही फारसे चांगले राहिलेले नाहीत. अनेकदा राजू शेट्टींनी बारामतीविरोधात शड्डू ठोकलेले सबंध महाराष्ट्रानं पाहिले आहेत. मात्र, भाजपशी बिनसल्यापासून राजू शेट्टींचा कल काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जास्त झुकू लागल्याचं दिसून येत आहे. त्याचाच ढळढळीत पुरावा म्हणून आता महाराष्ट्र विधान परिषदेतल्या राज्यपाल नियुक्त रिक्त होणाऱ्या १२ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या ४ जागांचा निवाडा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लावला जात असून यातली एक जागा राजू शेट्टींना देण्यात आली आहे. त्यामुळे आता राजू शेट्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून महाराष्ट्र विधानपरिषदेवर जाणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झालं आहे.

बैठकीत झालं शिक्कामोर्तब!

स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज बारामतीला शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. सुरुवातीला ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं गेलं. शरद पवारांनी देखील त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून तसं ट्वीट करून भेटीचे फोटो पोस्ट केले. नंतर मात्र राजू शेट्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढणार असल्यावर याच बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त आलं. दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी कोल्हापूर राजू शेट्टींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हा देखील सुरुवातीला जयंत पाटील राजू शेट्टींच्या मातोश्रींच्या प्रकृतीची विचापूस करण्यासाठी आले असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, नंतर खुद्द राजू शेट्टींनीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून असा प्रस्ताव आला असून त्यावर चर्चा सुरू असल्याचं स्पष्ट केलं होतं.

- Advertisement -

एकूण १२ राज्यपाल नियुक्त जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी महाविकासआघाडीच्या तिनही पक्षांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. अनेक इच्छुकांनी आपापल्या पक्षातील प्रमुखांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली असून त्यातून आपला विधानपरिषदेवरचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न ही मंडळी करताना दिसत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -