घरताज्या घडामोडी'अन्यथा सीरम इन्स्टिटयूटमधून लस घेऊन जाणारी वाहने बाहेर पडू देणार नाही'; राजू...

‘अन्यथा सीरम इन्स्टिटयूटमधून लस घेऊन जाणारी वाहने बाहेर पडू देणार नाही’; राजू शेट्टींचा पंतप्रधानांना इशारा

Subscribe

'जर महाराष्ट्राच्या लस पुरवठ्यात वाढ करण्यात आली नाही, तर सीरम इन्स्टिट्यूटमधून इतर राज्यात लस घेऊन जाणारी वाहने बाहेर पडू देणार नाही', असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा दिला आहे.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात विकेंडला कडक लॉकडाऊन आणि इतर वेळी संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे लसीकरण देखील तितकेच महत्त्वाचे असल्याने राज्यातील अनेक नागरिक लसीकरण करत आहेत. मात्र, राज्यातील आता लसीचा साठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी राज्यातील अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद करण्यात आली. एकीकडे केंद्र सरकारकडून लसीचा साठा देण्यात येत असल्याचे बोले जात असताना दुसरीकडे राज्यात पुरेसा साठा दिला जात नसल्याचे आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील वस्तुस्थिती मांडत राज्याला किती लसीचा साठा दिला जातो आणि इतर राज्याला किती देण्यात येतो, याबाबत माहिती देण्यात आली. यावरुन राजकारण रंगू लागले. दरम्यान, ‘जर महाराष्ट्राच्या लस पुरवठ्यात वाढ करण्यात आली नाही, तर सीरम इन्स्टिट्यूटमधून इतर राज्यात लस घेऊन जाणारी वाहने बाहेर पडू देणार नाही’, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा दिला आहे.

‘लस’कारणावरुन केंद्र आणि राज्यामध्ये राजकारण सुरु झाले आहे. ही खडाजंगी सुरु असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना पत्र लिहिले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले हर्ष वर्धन पाटील

‘आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना पत्र लिहिले आहे. जर एका आठवड्यात महाराष्ट्राच्या लसीच्या पुरवठ्यात वाढ झाली नाही, तर सीरम इन्स्टिट्यूटमधून इतर राज्यात लस घेऊन जाणारी वाहने बाहेर पडू देणार नाही’, असा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

सध्या कोरोनाविरोधातील लसीवरून देशात सुरु असलेले राजकारण सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा कळू लागले आहे. महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यात लसींचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र काही काळापुरती बंद करण्याची नामुष्की आरोग्य यंत्रणेवर आली आहे. लसीकरण केंद्र बंद पडण्याची संख्या आता वाढताना दिसत आहे. एका बाजूने भरमसाठ रुग्णवाढ, दुसर्‍या बाजूने नागरिकांची लसीची होणारी मागणी या दुहेरी संकटात सध्या राज्यातील आरोग्य यंत्रणा सापडली आहे. राज्य सरकार रोज लस द्या म्हणून केंद्राकडे मागणी करत आहे आणि केंद्र आम्ही सध्या एवढीच लस देऊ, या अविर्भावात आहे. केंद्राचे लस वाटपाचे धोरण जर पाहिले तर महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे.


हेही वाचा – Live Updates: नाशिक- रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा; पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांचे आंदोलन


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -