घरमहाराष्ट्रपुणेराजू शेट्टींना शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून भेट दिली फॉर्च्युनर कार

राजू शेट्टींना शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून भेट दिली फॉर्च्युनर कार

Subscribe

माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींना लोकवर्गणी काढून शेतकऱ्यांनी आलीशान फॉर्च्युनर कार भेट दिली आहे. त्यामुळे राजू शेट्टी भाऊक झाले होते. या आधी राजू शेट्टी यांनी अनेक वेळा शेतकऱ्यांसाठी मोर्चे आंदोलने केली आहेत. त्यामुळे लोकवर्गणी काढून राजू शेट्टींना शेतकऱ्यांनी खासदार केले होते.

या आधी सुद्धा शेतकऱ्यांनी दिले होते अर्थिक बळ –
शेतकऱ्यांसाठी आंदोलने करणाऱ्या राजू शेट्टी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात मात्तबरांविरोधात लढण्यासाठी खासकरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांना नेहमीच बळ दिले आहे. राजू शेट्टी यांना 2009 मध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी शेतकऱ्यांनीच लोकवर्गणी काढून त्यांना आर्थिक पाठबळ दिले होते.

- Advertisement -

राजूशेट्टींनी मानले आभार –
कार्यकर्त्यांनी दिलेल्या या भेटीनंतर राजू शेट्टी भारावून गेल आहेत. त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट करून आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये धन्यवाद सांगली-कोल्हापूरकर. आजपर्यंत कोणालाही विकलो गेलो नाही. इथून पुढेही विकलो जाणार नाही. चळवळीत आणि राजकारणात काम करत असताना जनतेशी प्रामाणिक राहिल्याबद्दल तुम्ही लोकवर्गणीतून जे बक्षिस दिले आहे त्याचा मी कृतज्ञपूर्वक स्वीकार करतो, असे म्हणत आभार मानले आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -