घरताज्या घडामोडीराज्यसभा निवडणुकीचे वाजले की बारा, निवडणूक आयोगाने थांबवली मतमोजणी

राज्यसभा निवडणुकीचे वाजले की बारा, निवडणूक आयोगाने थांबवली मतमोजणी

Subscribe

शुक्रवारी सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या मतदानात २८८ पैकी २८५ आमदारांनी मतदान केले. मात्र मतदान होवून आठ तास उलटूनही अजून मतमोजणीला सुरुवात झाली नाहीये.

महाविकास आघाडी आणि भाजपने प्रतिष्ठेची केलेली राज्यसभेची सहा जागांसाठीची (Rajya Sabha Election 2022 News)निवडणुक आज पार पडली. महाराष्ट्रात  राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते. शुक्रवारी सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या मतदानात २८८ पैकी २८५ आमदारांनी मतदान केले. मात्र मतदान होवून आठ तास उलटूनही अजून मतमोजणीला सुरुवात झाली नाहीये. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँगेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांच्या मतदानावर भाजपने तर भाजपच्या सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष उमेदवार रवी राणा यांच्यावर सत्ताधारी महाविकास आघाडीने आक्षेप नोंदवला आहे. आघाडीच्या नेत्यांनी केलेले मतदान रद्द करण्याची मागणी भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली .त्यानंतर निवडणूक आयोगाने मतमोजणी रोखली आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधिमंडळ परिसरात नेते आणि कार्यकर्ते यांची गर्दी रात्री १२.३० पर्यंत होती. मतदान होऊन आठ तास उलटूनही अजून आयोगाकडून काहीच माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही.यामुळे महविकास आघाडी सरकार बरोबरच भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या नाट्य सुरू झाले आहे.दरम्यान मतमोजणी संदर्भातील निवडणूक आयोगाची बैठक संपली असून लवकरच आयोग आपला निर्णय देण्यची शक्यता आहे..यामुळे सर्वच नेतेमंडळी विधानसभेत ठान मांडून बसले आहेत.

नेमके काय आहे प्रकरण

जितेंद्र आव्हाड यांनी मतदान केल्यानंतर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्याकडे मतपत्रिका दिली तर यशोमती ठाकूर यांनीही नाना पटोलेंकडे मतपत्रिका दिली. नंतर सुहास कांदे यांनीही शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीच्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवली असा आरोप करत या तिघांचे मत बाद करण्याची मागणी भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने याची शहानिशा करण्यासाठी मतमोजणीच रोखली. तसेच मतमोजणीचे व्हिडीओच निवडणूक आयोगाने मागवले होते.
Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -