Rajya Sabha Election 2022 : शिवसेना पक्ष प्रवेशाकडे संभाजीराजेंची पाठ, कोल्हापूरच्या दिशेने रवाना

Rajya Sabha Election 2022 Sambhaji Raje turn back to Shiv Sena party entry offer

युवराज संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी शिवसेनेची ऑफर धुडकावली असल्याची माहिती मिळाली आहे. संभाजीराजेंनी सेनेच्या ऑफरकडे पाठ फिरवली असून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत अशी माहिती समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजेंना हाती शिवबंधन बांधून घेण्यासाठी यावे असा निरोब दिला होता. परंतु राजेंनी पक्षप्रवेशाची ऑफर नाकारली आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी देण्याची संभाजीराजे यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांची ३ मे २०२२ रोजी राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) खासदारकीचा कार्यकाळ संपला आहे. संभाजीराजे राष्ट्रपतीनियुक्त खासदार होते. दरम्यान राजेंनी अपक्ष राज्यसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून राज्यसभेवर जाण्यास तयार असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले आहे. शिवसेनेकडून संभाजीराजेंना खासदारकीची संधी देण्यात येणार आहे. परंतु त्यांना शिवसेनेत प्रवेश करावा लागेल असे काही आमदारांचे मत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा राजेंना शिवबंधन बांधण्यासाठी बोलवलं होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंना दुपारी १२ वाजता शिवबंधन बांधण्यासाठी दुपारी 12 वाजता यावे शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश करावा, त्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात येईल असा निरोप खासदार संजय राऊत यांच्याकडे दिला होता. परंतु संभाजीराजेंनी या निरोपाकडे पाठ फिरवली आहे.

संभाजीराजे मराठा मोर्चा समन्वयकांशी चर्चा करणार

संभाजीराजे छत्रपती शिवसेनेची ऑफर नाकारल्यानंतर मराठा मोर्चाच्या समन्वयकांशी चर्चा करणार आहेत. मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचीसुद्धा भेट घेऊन त्यांनी विनंती केली आहे. दरम्यान मराठा समन्वयकांशी बैठक केल्यानंतर राजे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा : फार धावायला मी काय पाकीटमार आहे का?, राज ठाकरेंनी डॉक्टरांसोबतचा किस्सा सांगताच पिकला हशा