घरताज्या घडामोडीठरलं! राज्यसभा निवडणुकीत एमआयएम 'या' पक्षाला मतदान करणार

ठरलं! राज्यसभा निवडणुकीत एमआयएम ‘या’ पक्षाला मतदान करणार

Subscribe

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी निवडणुकीमध्ये एका राजकीय पक्षाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केलं आहे. जलील यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, राज्यात भाजपला पराभूत करण्यासाठी एमआएमने महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देण्याचे ठरवलं आहे.

राज्यात राज्यसभेच्या सहा जागांवर निवडणूक होत आहे. आज राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. ६ जागेवर सात उमेदवार रिंगणात असल्यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. यामध्ये अपक्ष आमदार कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीला आतापर्यंत १३ अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये एमआयएम आणि बहुजन विकास आघाडी कोणाला पाठिंबा देणार याकडे लक्ष लागले आहे. अखेर एमआयएमकडून भाजपला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात जुन्या पक्षाला पाठिंबा देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत माहिती दिली आहे.

राज्यसभा निवडणुकीत एमआयएमचे दोन आमदार कोणाला पाठिंबा देणार या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे. एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी निवडणुकीमध्ये एका राजकीय पक्षाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केलं आहे. जलील यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, राज्यात भाजपला पराभूत करण्यासाठी एमआएमने महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देण्याचे ठरवलं आहे. महाविकास आघाडीविरुद्ध आमचे राजकीय मतभेद मात्र कायम राहतील. एआयएमआयएमचे दोन आमदार काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगडी यांना मतदान करणार आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा असे जलील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

AIMIM खासदार इम्तियाज जलील यांनी काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केलं आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदाराला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी ट्विट करुन जाहीर केलं आहे. तसेच यासाठी काही अटी सुद्धा ठेवण्यात आल्या आहेत. धुलिया आणि मालेगावमधील आमच्या आमदारांच्या मतदारसंघांच्या विकासासाठी आम्ही काही अटी घातल्या आहेत. तसेच एमपीएससीमध्ये अल्पसंख्याक सदस्याची नियुक्ती करावी आणि महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढविण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली.

- Advertisement -

हेही वाचा : Rajya Sabha Election : ४ राज्यात १६ जागांवर राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान, कोण मारणार बाजी?

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -