भाजपला कटुतेचे फळ मिळणार, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील – नाना पटोले

Rajya Sabha Election Voting Nana Patole said BJP will get Results after Mahavikas Aghadi win
भाजपला कटुतेचे फळ मिळणार, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील - नाना पटोले

राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे चार उमेदवार निश्चित विजयी होतील असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजपने जे कटुतेचे राजकारण देशात सुरु केलं आहे. त्याचे फळ आज मिळणार असल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे. एमआयएमने काँग्रेसला पाठिंबा दिला असल्यामुळे एमआयएम काँग्रेसची बी टीम असल्याची टीका भाजपकडून करण्यात येत आहे. यावर नाना पटोले यांनी पलटवार करताना भाजपला चांगलेच फटकारले आहे. एमआयएम स्वतः महाविकास आघाडीला मतदान करणार आहे. यामध्ये काही गैर नाही. महाविकास आघाडी एमआयएमकडे मत मागण्यासाठी गेली नव्हती असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान भवनात माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी नाना पटोलेंनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. बाभळीचे झाडं लावले तर त्याला काटेच निघणार आंबे निघणार नाहीत. भाजपने जे कटुताचे राजकारण राज्यात आणि देशात सुरु केलं आहे. त्याचा परिाणाम आज त्यांना दिसणार आहे. महाविकास आघाडीचे चार उमेदवार जिंकून येतील. तेवढं आमच्याजवळ संख्याबळ आहे. असे नाना पटोले म्हणाले. निकाल संध्याकाळी लागणार आहे. त्यामुळे भाजप विनाआकडा कसा दावा करु शकतात. इथे ईव्हीएम मशीन नाही. महाविकास आघाडीचे चार उमेदवार नक्की निवडून येतील असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला आहे.

एमआयएमने मत दिल्यास गैर काय?

AIMIM ने काँग्रेसला पाठिंबा देण्याचे जाहीर केलं आहे. यामुळे एमआयएम काँग्रेसची बी टीम असल्याचे स्पष्ट झाले अशी टीका भाजपकडून करण्यात येत आहे. यावर नाना पटोलेंनी पलटवार केला आहे. मतदान कोणी कोणाला करावं हा त्यांचा भाग आहे. महाविकास आघाडीने मत मागितली नाहीत. त्यांना जर महाविकास आघाडीला मत द्यायचे असतील तर त्याच्यात गैर काय? आम्ही जर त्यांच्याकडे मत मागण्यासाठी गेलो असेल तर बी टीम कोणाची आहे ते जनतेला माहिती आहे. म्हणून भाजप जे सातत्याने खेळी करत आहे. भाजपने केलेल्या कटुतेचे फळ मिळणार आहे. भाजपची उलटी गिणती सुरु झाले असे नाना पटोले म्हणाले.


हेही वाचा : ठरलं! राज्यसभा निवडणुकीत एमआयएम ‘या’ पक्षाला मतदान करणार