घरताज्या घडामोडीआमदार लक्ष्मण जगताप आजारी असल्याने रुग्णवाहिकेतून मुंबईकडे रवाना, राज्यसभेच्या मतदानाला राहणार उपस्थित

आमदार लक्ष्मण जगताप आजारी असल्याने रुग्णवाहिकेतून मुंबईकडे रवाना, राज्यसभेच्या मतदानाला राहणार उपस्थित

Subscribe

निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना एका-एका आमदाराचे मत हे फार मौल्यवान आहे. यासाठी पक्षाकडून सर्वच आमदारांना मुंबईत दाखल होण्यासाठी सांगण्यात आले होते. आमदार लक्ष्मण जगताप आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही.

राज्यसभेच्या सहा जागांवर एकूण ७ उमेदवार रिंगणात आहेत. अशा परिस्थितीमध्ये राजकीय पक्षांकडून एका-एका मतासाठी आमदारांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहेत. आज राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यात येणार आहे. सर्व राजकीय पक्षाचे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. तर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आजारी असल्यामुळे मुंबईत आले नव्हते. मात्र मतदानासाठी आमदार जगताप रुग्णवाहिकेने मुंबईच्या दिशेना रवाना झाले आहेत. विधान भवनात उपस्थित राहून लक्ष्मण जगताप मतदान करतील. आजारी असल्यामुळे कुटुंबियांचा जगताप यांना मुंबईला पाठवण्यासाठी विरोध होता. परंतु पक्षाचा आदेश होता आणि पक्षाकडून त्यांना मुंबईत आणण्यासाठी एअर लिफ्टचीही सुविधा तयार ठेवली होती. अखेर ते रुग्णवाहिकेतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना विश्रांतीची गरज आहे. २ जून रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. राज्यसभेच्या मतदानासाठी त्यांना मुंबईला येण्यासाठी घरातून विरोध होता. परंतु निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना एका-एका आमदाराचे मत हे फार मौल्यवान आहे. यासाठी पक्षाकडून सर्वच आमदारांना मुंबईत दाखल होण्यासाठी सांगण्यात आले होते. आमदार लक्ष्मण जगताप आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही.

- Advertisement -

लक्ष्मण जगताप यांना मतदानासाठी विधान भवनात आणण्यासाठी एअल लिफ्ट करण्याची तयारी करण्यात आली होती. तसेच रस्ते मार्गाने रुग्णवाहिकेतून आणण्याची तयारी करण्यात आली होती. मुंबईत राज्यात सोमवारी पाऊस पडल्यामुळे वातवारणात बदल होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना रस्तेमार्गाने रुग्णावाहिकेतून आणण्यात येत आहे. पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांना मुंबई-पुणे महामार्गावरुन मुंबईत आणण्यात येत आहे. ते विधान भवनात मतदान करुन लगेच चिंचवडकडे रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


हेही वाचा : शरद पवारांनी ऐन वेळी मतांचा कोटा बदलल्यानं शिवसेनेचे टेन्शन वाढले

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -