संजय राऊत, संजय पवारांकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, मविआच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती

maharashtra political crisis sanjat raut criticizes eknath shinde and bjp

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या एकीच दर्शन घडलं आहे. राज्यसभेच्या उमेदवारीवरुन शिवसेनेत पेच निर्माण झाला होता. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश केला असता तर त्यांना उमेदवारी देण्यात येणार होती. परंतु राजेंनी नकार दिल्यामुळे संजय पवार यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे. दरम्यान मतांची जुळवाजूळव होत नसल्यामुळे संभाजीराजे छत्रपती राज्यसभा निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे. संजय राऊत यांच्यासह महाराष्ट्रातील ६ खासादारांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. यामध्ये संभाजीराजेंचंही नाव आहे. दरम्यान राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. संजय राऊत यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्यात आले आहे. तर संजय पवार यांना राज्यसभेवर जाण्याची संधी देण्यात आली आहे.

महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली होती. काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा निवडणूक कार्यालयात पोहोचले असल्याची माहिती मिळाली आहे. सेनेकडून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या एकीचे दर्शन घडलं आहे.

संभाजीराजे माघार घेणार असल्याची शक्यता? 

युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यापासून नकार दिला आहे. अपक्ष निवडणूक लढण्यावर संभाजीराजे ठाम आहेत. परंतु त्यांना लागणारे मतांचे गणित जुळत नाही आहे. भाजपकडून दोन तर महाविकास आघाडीकडून ४ उमेदवार देणार आहेत. संभाजीराजेंना मत कमी पडत आहेत. तसेच ज्या १० आमदारांचे अनुमोदन लागते त्यांच्या संख्येची देखील पूर्तता होत नाही आहे. यामुळे संभाजीराजे माघार घेण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : केंद्रीय यंत्रणांना कारवाईचा अधिकार पण गैरवापर होऊ नये, अजित पवारांची ईडीच्या छापेमारीवर प्रतिक्रिया