Rajyasabha Bypolls: राज्यसभेची निवडणूक बिनविरोध ? कॉंग्रेस नेते फडणवीसांना भेटले

कोर कमिटीसोबत चर्चा करुन याबाबत निर्णय घेणार असल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं

Rajyasabha Bypolls: nana patole balasaheb thorat meet devendra fadnavis for discuss Rajya Sabha elections unopposed
Rajyasabha Bypolls: राज्यसभेची निवडणूक बिनविरोध ? कॉंग्रेस नेते फडणवीसांना भेटले

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी भाजप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांची भेट घेतली आहे. राज्यसभा पोटनिवडणूकीसाठी भाजपकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर राज्यसभा पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर निवासस्थानी भेट घेतली आहे. कोर कमिटीसोबत चर्चा करुन याबाबत निर्णय घेणार असल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी २७ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. २७ सप्टेंबरपर्यंत भाजपने उमेदवारी माघार घेतली नाही तर निवडणूक घेण्यात येईल. मात्र आता भाजपच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागंलं आहे. भाजपकडून अर्ज माघारी घेण्यात आला नाही तर संजय उपाध्याय आणि रजनी पाटील आमने – सामने असतील.

कोर कमिटी निर्णय घेईल

राज्यसभा निवडणूक बिनविरोध लढवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी म्हटलं आहे. यावर फडणवीस यांनी बुधवारी म्हटलं आहे की, याबाबत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्या नेत्यांनी जे म्हटलं आहे. त्याबाब मी स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. कोर कमिटीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कमिटी निर्णय घेईल असे फडणवीस यांनी म्हटलं आहे. बिनविरोध होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा आम्हाला विचारुन कशी होणार? आम्हीही काही विचार करुन उमेदवारी दिली आहे. कोर कमिटी निर्णय घेईल तसेच होईल असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

४ ऑक्टोबरला निवडणूक

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी खुलं मतदान असल्यामुळे पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडीकडे अधिक संख्याबळ आहे. यामुळे भाजप आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकते. महाविकास आघाडीचे संख्याबळ घटले तर निवडणूक होण्याची शक्यता आहे. भाजपकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला नाही तर ४ ऑक्टोबरला निवडणूक घेण्यात येईल.


हेही वाचा : केंद्र सरकारने जबाबदारी झटकल्याचा अर्थ निघू शकतो, इम्पेरिकल डेटाबाबत अजित पवारांचे वक्तव्य