घरमहाराष्ट्रRSS वाले युपी निवडणुकीपूर्वी बड्या हिंदू नेत्याची हत्या करतील; टीकैत यांचं खळबळजनक...

RSS वाले युपी निवडणुकीपूर्वी बड्या हिंदू नेत्याची हत्या करतील; टीकैत यांचं खळबळजनक वक्तव्य

Subscribe

शेतकरी नेते राकेश टीकैत (Rakesh Tikait) यांनी मंगळवारी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. आगामी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपूर्वी आरएसएस एका बड्या हिंदु नेत्याची हत्या करेल आणि त्यानंतर हिंदू-मुस्लीम दंगली करुन निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतील, असं खळबळजनक वक्तव्य टीकैत यांनी केलं. हरयाणातील सिरसामध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राकेश टिकैत यांनी करनालमध्ये शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज प्रकरणी अधिकाऱ्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पुढे राकेश टीकैत यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकारला या आंदोलनात नरसंहार व्हायला हवा होता. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील हिंदू नेत्यांची हत्या करुन हिंदू-मुस्लीम दंगल घडवून निवडणूका जिंकायच्या आहेत, असं खळबळजनक वक्तव्य टीकैत यांनी केलं.

- Advertisement -

मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यावर निशाणा

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचं आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका टीकैत यांनी केली. याआधी हरयाणात शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, शेतकरी मागे हटणार नाहीत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू, असं देखील टीकैत यांनी ठणकावून सांगितलं. शेतकरी आंदोलनाचं केंद्र दिल्लीऐवजी हरयाणात वळवावं, असा मुख्यमंत्री खट्टर यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे, हरयाणात अशा पद्धतीच्या घटना जाणूनबुजून घडवून आणण्यात येत आहेत. परंतु, आम्ही केंद्रासोबत दोन हात करायला तयार आहोत, असं टीकैत म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -