घर उत्तर महाराष्ट्र ‘रक्षाबंधन’ : बहीण म्हणजे मायेचे साजूक तूप, आईचे दुसरे रूप

‘रक्षाबंधन’ : बहीण म्हणजे मायेचे साजूक तूप, आईचे दुसरे रूप

Subscribe

नाशिक : मला बहीण नाही सर..! असा केविलवाणा स्वर चित्रकलेच्या तासाला कानी पडताच मन स्तब्ध झाले. कलेचा तास सुरू असतांना ‘रक्षा बंधन हा सण कोण कोण व कसा साजरा करणार?’ असा प्रश्न मुलांना केला. वर्गातील 4 विद्यार्थी सोडून सर्वांनी आनंदाने हात वर केला. मागील बाकांवरील त्या चार मुलांपैकी मी एकाला तू हात का वर केला नाही? असे विचारले. त्याने अगदी निरागसपणे ‘मला बहीण नाही सर..!’ असे उद्गार काढले व मान खाली घातली. बाकी तीन विद्यार्थ्यांचे तेच उत्तर होते. तेंव्हा एक कलाशिक्षक म्हणून माझ्या मनात बहीण नसलेल्या मुलांच्या मनाची या सणाच्या दिवशी होणारी स्थिती, घुसमट कशी असेल असा प्रश्न घोळत राहिला.

समाजात अनेक असे भाऊ असतील ज्यांना बहीण नाही व अनेक बहिणी असतील ज्यांना भाऊ नाही, मग रक्षा बंधन सणाच्या दिवशी त्यांच्या मनातील भाव नेमके कसे असतील याविषयी विचार करत असताना वरील विषयात फलक रेखाटनाची कल्पकता सुचली व बहीण नसणार्‍या भावांच्या भावनेला वाट मोकळी करून दिली. रक्ताचं नातं जरी नसेल तरी मानलेली बहीण या हातांना नक्की राखी बांधेल. खरे तर प्रत्येकाला बहीण असावी. कारण बहीण म्हणजे मायेचे साजूक तूप, आईचे दुसरे रूप, काळजीरूपी धाक, प्रेमळ तिची हाक, कधी बचावाची ढाल, तर कधी मायेची उबदार शाल.

- Advertisement -

बहीण भावाचं नातं म्हणजे सगळ्यात खास नातं. प्रेम, राग, लढाई, रुसवे फुगवे असूनही सुख-दुःखात सर्वात जवळचं नातं म्हणजे बहीण भावाचं नातं. अगदी निखळ, नि:स्वार्थ. श्रावण पौर्णिमेला सर्व देश व विदेशात साजरा होणार्‍या, प्रेमाची, संबंधाची परंपरा कायम जपणार्‍या रक्षाबंधन या कौटुंबिक सणाच्या सर्वांना रंगीत खडू माध्यमातील नूतन माध्यमिक विद्यालय भाटगावच्या कला शिक्षक देव हिरे यांनी फलक रेखाटनातून अशा शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -