घरमहाराष्ट्रनाशिकमध्ये आज मराठा क्रांती मूक आंदोलन

नाशिकमध्ये आज मराठा क्रांती मूक आंदोलन

Subscribe

खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात होणार आंदोलन

मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापूरमध्ये आंदोलनांची सुरुवात झाल्यानंतर सोमवारी (दि.21) नाशिकमध्ये मूक आंदोलन होत आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार असल्याने रविवारी सायंकाळी ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली असून, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार, खासदारांनाही निमंत्रित केले आहे.

गंगापूररोडवरील केटीएचएम महाविद्यालयाशेजारील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहाच्या मैदानावर हे आंदोलन होत आहे. त्यासाठी क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. आंदोलनाच्या रस्त्यावरील दुभाजकांना भगवे झेंडे लावण्यात आले असून, मॅरेथॉन चौकात खासदार छत्रपती संभाजीराजेंचे मोठे फलकही लागले आहेत. ‘समाज बोलला, आम्ही बोललो, आता तुम्ही बोला’ अशी भूमिका घेत लोकप्रतिनिधींना आरक्षणाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, अ‍ॅड.शिवाजी सहाणे व कॉ.राजू देसले यांनी सांगितले.

- Advertisement -

आंदोलनानंतर बैठक

मराठा आरक्षणप्रश्नी लवकरच पुणे ते मुंबई हा लाँगमार्च काढण्यात येणार आहे. या आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमध्ये बैठकही होणार आहे. त्यानंतर आंदोलनाची दिशा निश्चित होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -