घरमहाराष्ट्रराम कदमांचा मोठा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीने दिला दगा

राम कदमांचा मोठा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीने दिला दगा

Subscribe

अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत सत्तेसाठी शिवसेना राष्ट्रवादीसोबत युती करणार होते, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे.

गेल्या दोन आठवड्यांपूर्वी अहमदनगर माहापालिकेच्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक अशा २४ जागांवर विजय मिळाला. सर्वाधिक जागांवर निवडूण आल्यानंतरही शिवसेनेला सत्तेपासून दूर राहावे लागत आहे. कारण भाजपने राष्ट्रवादीशी युती केली. त्यामुळे शिवसेनेला सर्वाधिक जागांवर निवडूण आल्यानंतरही सत्तेपासून वंचित राहावे लागत आहे. आता या निवडणुकी संदर्भात शिवसेना नेते रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपला हरवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये युती होणार होती. परंतु, निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीने भाजपशी युती करुन शिवसेनाला सत्तेपासून दूर केले.

राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आहेत – रामदास कदम

आज अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये राष्ट्रवादीने भाजपशी युती केली. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. अहमदनगर महानगरपालिकेत सत्ता यावी यासाठी ६८ जागांपैकी ३५ जागांवर बहुमत येणे अपेक्षित होते. यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी युती करणार होते. त्याचबरोबर इतर पक्षांशी देखील बोलणी चालू होती, असे रामदास कदम म्हणाले आहेत. भाजपला हरवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे जरुरीचे होते. त्यासाठी मी स्वत: अजित पवार आणि विखे पाटील यांच्यासोबत बोललो होतो. परंतु, राष्ट्रवादी दुतोंडी आहे. राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असे रामदास कदम म्हणाले.

- Advertisement -

‘सत्तेतून बाहेर पडलो तर राष्ट्रवादी जागा घेईल’

रामदास कदम म्हणाले की, विधानसभा निवडणूक सुरु होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता सत्तेतून बाहेर पडलो तर राष्ट्रवादी आमची जागा घेईल, अशी भीती वाटत असल्याचे कदम म्हणाले आहेत.


हेही वाचा – रामदास कदम हे उध्दव ठाकरेंचं पाळलेलं कुत्रं – नितेश राणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -