‘या सेलिब्रिटिंच्या ट्विटची चौकशी करणार का?’; राम कदम यांनी शेअर केले ट्विट

ram kadam share some tweets now mva government can investigate the tweets of these celebrities

प्रसिद्ध पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर भारतातील कलाकारांनी, खेळाडूंनी ट्विट केलं होतं. या सर्वांच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून आलं असून या सर्व ट्विटची चौकशी केली जाणार आहे. याबाबतचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. यावरुन आता भाजप आक्रमक झाली असून आमदार राम कदम यांनी काही ट्विट शेअर केले आहेत. या सर्वांची पण चौकशी होणार का? असा सवाल केला आहे. त्यामुळे आता राज्यात ट्विटमुळे नवं राजकीय वादळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

राम कदम यांनी काही ट्विट शेअर केले आहेत. यामध्ये “No prison is big enough to contain free speech. स्वतंत्र विचारों को कभी बेड़ियों में नहीं जकड़ा जा सकता।” असं ट्विट काही सेलिब्रिटीजनी केलं आहे. यामध्ये पत्रकार रविश कुमार, पत्रकार अभिसार शर्मा, बॉलिवूड अॅक्ट्रेस स्वरा भास्कर, राजकीय नेता हार्दिक पटेल आदींनी हे ट्विट केलं आहे. हे ट्विट त्यांनी पत्रकार मनदिप पुनीयाला दिल्ली पोलिसांनी शेतकरी आंदोलन स्थळावरुन ग्राऊंड रिपोर्टिंग केलं म्हणून अटक केली होती. याविरोधात हे ट्विट होतं. याशिवाय, राम कदम यांनी अजून काही ट्विटचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये बॉलिवूड कलाकार सोनम कपूर, परिणीती चोप्रा, ह्रतिक रोशन, अनुराग कश्यप, फरहान अखअतर, अली फजल यांच्या ट्विटचे फोटो आहेत. या मध्ये या सर्वांनी कृपया करुन हा थ्रेड वाचा असं म्हटलं आहे.

Image

राम कदम यांनी हे फोटो ट्विट करत काँग्रेस नेते आणी महाराष्ट्र सरकारने खालील सिलेब्रिटीजचे ट्विट काळजीपूर्वक वाचावे. काँग्रेसच्या भाषेत सर्व भाषा सारखी आहे. आता या सर्व सिलेब्रिटीजवर पण कारवाई करणार? की आमच्या लता दीदी आणी सचिनला त्रास देणार? असा सवाल केला आहे.

Image

सेलिब्रिटींच्या ट्विटची होणार चौकशी

रिहानाने शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर भारतातील कलाकारांनी, खेळाडूंनी ट्विट केलं होतं. या सर्वांच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून आलं आहे. यामुळे काँग्रेसच्या शिष्टमंडळाची आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटीजच्या ट्विटच्या चौकशी करण्याची मागणी केली. एकाच वेळी आणि सारखच ट्विट करण्यामागचं कारण काय? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? यांचा बोलविता धनी कोण आहे? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.


हेही वाचा – सचिन, लतादीदींचे ट्विट कुणाच्या दबावाखाली ? ठाकरे सरकार करणार इंटेलिजन्स चौकशी, भाजपने चौकशीवर केली टिका