घरताज्या घडामोडीराम नवमीनिमित्त शिर्डीतील साई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा; देशभरात उत्साहाचे वातावरण

राम नवमीनिमित्त शिर्डीतील साई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा; देशभरात उत्साहाचे वातावरण

Subscribe

रामनवमीनिमित्त राज्यासह देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यंदा रामनवमी जल्लोषात साजरी केली जात आहे. रामनवमीनिमित्त अयोध्येत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रामनवमीच्या उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डीतील साई मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.

रामनवमीनिमित्त राज्यासह देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यंदा रामनवमी जल्लोषात साजरी केली जात आहे. रामनवमीनिमित्त अयोध्येत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रामनवमीच्या उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डीतील साई मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. आज पहाटे काकड आरतीपासूनच शिर्डीत दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. (ram navami 2023 celebrated across the country shri gajanan maharaj shegaon shri sai baba temple shirdi)

महाराष्ट्रात नागपूर, नाशिक, सातारा, शिर्डी, शेगाव, मुंबईसह राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी राम नवमी साजरी केली जात आहे. राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. राम नवीमीनिमित्त राज्याबाहेरील साईभक्त मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले आहेत. सर्व भक्तांना दर्शन घेता यावं यासाठी आज साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थांनी घेतला आहे.

- Advertisement -

वडाळा राम मंदिरात भाविकांची गर्दी

मुंबईतील वडाळा येथील राम मंदिरातही श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. रामनवमीनिमित्त मंदिराला सजावट करण्यात आली आहे. मंदिरातील गाभाऱ्याला फुलांची आरास करण्यात आली आहे.

- Advertisement -

रामनवमीनिमित्त शेगावमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम

बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात संत गजानन महाराज मंदिरात श्री राम जन्मोत्सव उत्सवाला सुरूवात झाला आहे. 550 दिंड्यांसह 2 लाख भाविक शेगावात दाखल झाले आहेत. संत गजानन महाराज मंदिरात आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. राम नवमीमित्त शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात राम नवमी उत्सवाचा मुख्य दिवस आज साजरा होत आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच यावर्षी रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात शेगावात साजरा होत आहे.

राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या असून, आज सकाळी सात वाजता आरतीने रामनवमी मुख्य उत्सवास सुरूवात झाली. तसेच, दुपारी रथ, अश्वासह पालखीची नगर परीक्रमा असे दिवसभर अनेक कार्यक्रम मंदिरात होणार आहेत. मुख्य आरती दुपारी 12 वाजता असणार आहे. रामनवमी उत्सवासाठी जवळपास साडेपाचशे दिंड्या आणि दोन लाख भाविक शेगावात दाखल झाले आहेत.


हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हिम्मत नाही, सरकार नपुंसक; सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -