घरमहाराष्ट्रकडाक्याच्या उन्हात रमजानचे रोजे, मुस्लीम बांधवांची कसोटी

कडाक्याच्या उन्हात रमजानचे रोजे, मुस्लीम बांधवांची कसोटी

Subscribe

मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना रमजानला १६ मेपासून सुरूवात झाली. अनेक मुस्लीम बांधवांनी पहिला रोजा मोठ्या उत्साहाने पकडला असल्याचे चित्र बघावयास मिळाले. मात्र यंदा रमजान कडाक्यात उन्हात आल्याने रोजेदारांची चांगलीच कसोटी लागणार आहे.
इस्लाम धर्मात ज्या पाच गोष्टी प्रत्येक मुस्लिमावर अनिवार्य करण्यात आल्या आहेत, त्यापैकी वर्षातून एकदा येणारे तीस रोजे ठेवण्याचे ताकीद करण्यात आली आहे. प्रत्येक स्त्री-पुरुष बालकांवर हे रोजे ठेवणे बंधकारकच असते. त्यामुळे प्रत्येक मुस्लीम आपल्या जीवनात रमजानचा महिना येणे आपले भाग्य समजतो. मागील वर्षापासून रोजे पावसाळा ऋतुत येत होते. यावर्षी शेवटचे जवळपास १० रोजे मृग नक्षत्रात येणार आहेत. दरम्यान तप्त उन्हात पाण्याचा घोट न घेता १५ तासांचा उपवास करणे ही एक कसोटीच ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -