पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची आमची भूमिका – रामदास आठवले

Ramdas Athavale has expressed his desire to have Devendra Fadnavis as Chief Minister again

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवें पाठोपाठ केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यात दुसरा मुख्यमंत्री ब्राम्हण समाजाचा होईल आणि ते देवेंद्र फडणवीस असतील, अशी भूमिका मांडली आहे. डणवीस हे सक्षम असणारे नेतृत्व आहे, गेल्या पाच वर्षात त्यांनी भाजपला ताकद देण्याचे काम केले आहे. ते सांगलीच्या आटपाडी मध्ये ते बोलत होते. यावेळी मी सोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मनसे बरोबर युती करणे भाजपला परवडणार नाही. मनसेला सोबत घेण्याचा भाजपने विचार करू नये. मी सोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही, असे मत केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडले. यावेळी मनसेसोबत युती न करण्याचे कारणही रामदास आठवले यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास, सबका विश्वास, अशी ही भूमिका मांडली आहे. पण मनसेसोबत युती केल्यास त्या भूमिकेला तडा जाऊ शकतो. महाराष्ट्रात भाजप आणि आरपीआय सोबत येत सत्ता आणू आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची आमची भूमिका आहे, असेही आठवले यांनी म्हटले आहे.

याचवेळी त्यांनी राज ठाकरे बाळासाहेबांची कॉपी करु शकत नाहीत, असेही म्हटले आहे. भोंग्याच्या वादावरुनही त्यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले आहे. सगळ्या मुस्लिमांना त्रास देण्याची बाळासाहेब ठाकरेंची भूमिका कधीच नव्हती, त्यामुळे राज ठाकरे बाळासाहेबांची कॉपी करु शकत नाहीत. बाळासाहेबांची कॉपी करणे एवढे सोप नाही, असा शब्दांत त्यांनी मनसेला फटकारले आहे. इतकेच नव्हे तर, आम्हाला मनसेची गरज नाही. त्यामुळे चूकीच्या भूमिका मांडणाऱ्या लोकांची भाजपला आवश्यकता नाही. भाजप त्यांना घेणारही नाही, भाजप विरोधकांशी लढण्यासाठी सक्षम असल्याचेही आठवले यांनी म्हटले आहे.