घरताज्या घडामोडीमहामंडळातही आरपीआयला स्थान मिळावे, रामदास आठवलेंनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

महामंडळातही आरपीआयला स्थान मिळावे, रामदास आठवलेंनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

Subscribe

राज्यात शिंदे गट-भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर आता आमदारांना मंत्रीपदाचे वेध लागले आहेत. मंत्रिमंडळात कुणाचा नंबर लागणार, याचे आराखडे बांधले जात आहेत. मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे आणि भाजप पक्षातील नेत्यांना किती मंत्रीपदं मिळणार, याबाबत चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, महामंडळातही आरपीआयला स्थान मिळावे, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

रामदास आठवले यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सत्तेमध्ये आरपीआयला सुद्धा वाटा द्यावा, अशी मागणी देखील आठवलेंनी फडणवीस यांच्याकडे केली आहे. शिंदे गटाकडे जास्त आमदार आहेत. त्यामुळे शिंदेंना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले पाहीजे. पण ठाकरे आणि शिंदे दोघेही धनुष्यबाण चिन्हाची मागणी करतील. अशा वेळी निवडणूक आयोग दोन्ही बाजूंचा विचार करून निर्णय घेईल, अशी इच्छा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी शिवसेना यांच्यामध्ये फरक आहे. शिंदे गटाकडे दोन-तृतीयांश आमदार आहेत. त्यामुळे खरी शिवसेना नक्की कोणाची?, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मात्र, एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळावं, अशी आमची इच्छा आहे, असं आठवले म्हणाले.


हेही वाचा : फडणवीस देवमाणूस पण पोस्टर्सवरून कमळासह भाजपचे नेते गायब

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -