राज ठाकरेंच्या भूमिकेला रामदास आठवलेंचा विरोध, म्हणाले, आम्ही मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण…

Ramdas Athavale criticized Thackeray government BJP won and Lost big tigers
भाजपने तिसरी जागा जिंकून बड्या वाघांची मान झुकवली, रामदास आठवलेंची मविआवर टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावे असा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर उत्तर प्रदेश आणि देशातील भोंग्यांवर कारवाई सुरु झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये भोंगे हटवले आहेत. तर महाराष्ट्रात भोंगे हटवण्यावरुन राजकारण तापलं आहे. राज्यातील मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी कोणी आले तर आमच्या पक्षाचे कार्यकर्ते त्याला विरोध करतील असे वक्तव्य रिपाई अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी जर कोणी आले तर आम्ही संरक्षण करु असे रिपाई अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले आहेत. आम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचा विरोध करतो आहे. भोंग्यांवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यामध्ये आता रामदास आठवलेंनी विरोधी भूमिका घेतल्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. मुस्लिम समुदायाला शांततेची भूमिका घेण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.

दरम्यान मुस्लिम समाजात काही मौलानांकडून चिथावणीखोर वक्तव्य करण्यात येत आहे. यामुळे समाजातील चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या मौलानांनी शांत राहिले पाहिजे. उलटसुलट बोलून त्यांनी आपल्या समाजावर संकट ओढावून घेऊ नये असे रामदास आठवलेंनी सांगितले आहे.

उत्तर प्रदेशात भोंगे हटवले

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनधिकृत भोंगे हटवण्याचे निर्देश दिले होते. यानंतर योगी सरकारने आणि पोलिसांनी कारवाई करत साडेचार हजारांपेक्षा अधिक भोंगे मशिदींवरुन आणि मंदिरांवरुन हटवले आहेत. तर हजारो भोंग्यांचे आवाज नियमांनुसार कमी केले आहेत. योगींच्या भूमिकेचे राज ठाकरेंनीसुद्धा स्वागत करत महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. यानंतर आता रामदास आठवलेंनी विरोधी भूमिका घेतली असल्यामुळे संघर्ष वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

मनसेकडून प्रतिक्रिया नाही

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या विरोधी भूमिकेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मनसेकडून देण्यात आली नाही. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे विरोधकांना आपल्या सभेतूनच प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा आहे. या सभेमध्ये सर्व विरोधकांना प्रत्युत्तर राज ठाकरेंकडून देण्यात येईल. तसेच भोंग्यांवरील अल्टिमेटमवरसुद्धा राज ठाकरे आक्रमक होऊ शकतात.


हेही वाचा : योगी-भागी संदर्भातील मतपरिवर्तन संशोधनाचा विषय, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका