घरताज्या घडामोडीमराठा समाजाचे खणखणीत नाणे नारायण राणे, रामदास आठवलेंचे काव्य शैलीतून राणेंचे कौतुक

मराठा समाजाचे खणखणीत नाणे नारायण राणे, रामदास आठवलेंचे काव्य शैलीतून राणेंचे कौतुक

Subscribe

महाविकास आघाडीचे काम फक्त खाणे पण आमचा काम आहे मराठा आरक्षणाचे गीत गाणे

केंद्रीय मंत्री रामदास आठवले आपल्या काव्यशैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. आठवले कोणत्याही गोष्टीला दाद देताना किंवा टीका करतानाही कवितेतूनच करत असतात. सध्या ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण आणि काँग्रेसच्या स्वबळावर केलेल्या वक्तव्यामुळे रामदास आठावले बरेच चर्चेत आहेत. तर आज नवीमुंबईमध्ये मराठा आरक्षणाबाबात झालेल्या गोलमेज परिषदेत रामदास आठवलेंनी संबोधन केलं आहे. यावेळी जे मराठा समााचं आहे खणखणीत नाणे त्यांचे नाव नारायण राणे अशा शब्दात रामदास आठवले यांनी कौतुक केलं आहे. यामुळे बैठकीत राणेंसह सर्वच उपस्थित असलेल्या लोकांना हसू आवरता आलं नाही.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नवी मुंबईत भाजपने राजव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद आयोजित केली होती. या परिषदेस भाजप नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते नारायण राणे, प्रसाद लाड आणि माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी भाषण केलं. भाषणा दरम्यान आठवलेंनी राणेंचे तोंडभरून कौतुक केलं आहे.

- Advertisement -

रामदास आठवले यांनी म्हटलं आहे की, जे मराठा समाजाचे आहे खणखणीत नाणे त्यांचे नाव नारायण राणे, महाविकास आघाडीचे काम फक्त खाणे पण आमचा काम आहे मराठा आरक्षणाचे गीत गाणे अशी प्रकारे काव्य रामदास आठवले यांनी केलं आहे. रामदास आठवलेंच्य काव्यादरम्यान नारायण राणे आणि इतर पदाधिकाऱ्यांमध्ये हशा पिकला होता आणि उपस्थित सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाट करुन या काव्यास दादही दिली आहे. रामदास आठवले यांनी रिपाईचा मराठा आरक्षणासाठी पाठिंबा असल्याचे जाहीर केलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -