महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी सेना भाजप युतीचा आठवलेंनी सांगितला फॉर्म्युला

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपला एक नवी ऑफर दिली आहे. शिवसेना आता अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देणार नाहीये. त्यामुळे भाजपाने आता शिवसेनेला पाठींबा द्यावा आणि उपमुख्यमंत्री पद घ्यावे, अशी ऑफर रामदास आठवले यांनी भाजपला दिली आहे. तसेच महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपच्या युतीचा फॉर्म्युला आठवलेंनी सांगितला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद द्यावं

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यांची तब्येत सुद्धा ठीक नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याऐवजी दुसऱ्या कोणत्या तरी नेत्याला मुख्यमंत्रीपद द्यावं, अशी मध्यंतरी चर्चा होती. माझा अशी आहे की इतरांना कोणालातरी बघण्यापेक्षा माजी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद द्यावं, असं रामदास आठवले म्हणाले.

शिवसेना आणि भाजपाने एकत्र यावं

अडीच वर्षांचा जो शिवसेनेचा हेतू होता. त्या अडीच वर्षांच्या फॉरम्युल्याप्रमाणे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपाने एकत्र यावं आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न करावा, अशा पद्धतीचं आवाहन आठवलेंनी उद्धव ठाकरे यांना केलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ते संपूर्ण हिवाळी अधिवेशनाला गैरहजर राहीले होते. त्यामुळे महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये जोरदार टीका-टीप्पणी सुरू होती. याचवेळी मुख्यमंत्री बरे होईपर्यंत आदित्य ठाकरे किंवा शिवसेनेतील इतर प्रमुख नेत्यांकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्यावी, अशी प्रकारची मागणी भाजपच्या नेत्यांकडून सुरू होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे कोणत्या तरी नेत्याला मुख्यमंत्रीपद द्यावं, अशी मध्यंतरी चर्चा होती. असं रामदास आठवले म्हणाले. परंतु इतरांना कोणालातरी बघण्यापेक्षा माजी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद द्यावं,असं रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटी ह्या पहिल्या बोगद्याचे खणन, भारतातील सर्वात मोठ्या ‘मावळा’ ह्या टिबीएम संयंत्राच्या सहाय्याने आज पुर्ण झाले. या बोगदा खणन कामाचा ब्रेक थ्रू आज गिरगाव चौपाटी येथे पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. मात्र, मुख्यमंत्री यांच्या गैरहजेरीमुळे विरोधी पक्षातील नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदानंतर आता थेट अडीच वर्षांच्या फॉरम्युल्याप्रमाणे शिवसेना-भाजप एकत्र यावे, अशा प्रकारचं आवाहनं केलं जातंय. त्यामुळे हे आवाहन का करण्यात येतंय, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : Mumbai coastal road: प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटी दरम्यान कोस्टल रोडच्या टनेलिंग काम पूर्ण, मावळा टीबीएमची पहिली मोहीम फत्ते