घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी दसरा मेळावा घ्यायला हरकत नाही, रामदास...

उद्धव ठाकरेंनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी दसरा मेळावा घ्यायला हरकत नाही, रामदास आठवलेंचा सल्ला

Subscribe

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात एका खाजगी कामानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आले होते. यावेळेस त्यांनी दसरा मेळाव्याबाबत बोलताना खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे, दसरा मेळाव्याची त्यांनाच परवानगी मिळाली पाहिजे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी कुठेही दसरा मेळावा घ्यावा, असा सल्ला रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

दसरा मेळाव्याची त्यांनाच परवानगी मिळाली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी कुठेही दसरा मेळावा घ्यायला हरकत नाही. त्याचबरोबर मेजॉरिटीची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने त्यांना परवानगी द्यावी, अशी सूचना रामदास आठवले यांही मुंबई महानगरपालिकेला दिली आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांकडून राज ठाकरे यांची भेट होत असल्यावर बोलताना, त्यांनी भाजपला सल्ला देत मनसेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोबत घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. रिपब्लिकन पक्ष हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. मागच्या वेळेला बीजेपी आणि आरपीआय एकत्र असताना 82 जागा आणि निवडून आणल्या. त्यामुळे मेजॉरिटी 227 जागांपैकी 114 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यामध्ये आपल्याला काही अडचणी येणार नाही.

राज ठाकरेंना सोबत घेतलं तर भाजपचे नुकसान होऊ शकतं अशी उत्तर भारतीय, गुजराती मतं आहेत. साउथ इंडियनची मत आहेत ही मतं आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे आपला तोटा होण्याची शक्यता आहे. माझी भुमिका अशी आहे की, राज ठाकरे यांना सोबत घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. रिपब्लिकन पक्ष ताकदीने भाजपच्या पाठी उभा आहे, असं रामदास आठवले म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -