घरमहाराष्ट्रउच्चशिक्षित लोकप्रिय नेतृत्व हरपले - रामदास आठवले

उच्चशिक्षित लोकप्रिय नेतृत्व हरपले – रामदास आठवले

Subscribe

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनाने सुस्वभावी, उच्चशिक्षित, सर्वांना न्याय देणारे देशाचे लोकप्रिय नेतृत्व हरपले आहे अश्या शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या अंत्यविधिस रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.

काय म्हणाले आठवले

“दिवंगत मनोहर पर्रीकर हे सुस्वभावी, साधी राहणी आणि उच्चविचार असणारे व्यक्तिमत्व असल्याने ते गोव्यातील प्रचंड लोकप्रिय झाले. त्यांची लोकप्रियता गोवा या राज्यापूर्ती सीमित न राहता त्यांचे नेतृत्व आणि लोकप्रियता देशपातळीवर पोहोचली होती.भारताचे संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले तसेच गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अजोड काम केले आहे. पक्षभेद विसरून गोव्यातील सर्व जनता दिवंगत मनोहर पर्रीकरांवर प्रेम करीत होती. गोव्याचा आणि देशाचा विकास व्हावा याचा त्यांनी ध्यास घेतला होता आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते लोकसेवेत कार्यरत होते.ते आयआयटी मध्ये उच्चशिक्षण घेतलेले पाहिले आमदार आणि मुख्यमंत्री होते. त्यांच्याशी माझी चांगली मैत्री होती.त्यांचे माझे जवळचे संबंध होते. कुणावरही अन्याय न करणारे सर्वांना न्याय देणारे ते नेते होते. राजकारणात अत्यंत साधा सरळ प्रेमळ निर्मळ स्वभाव असणारे अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे दिवंगत मनोहर पर्रीकर होते.” – रामदास आठवले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -