काही ठिकाणी मंदिरांच्या जागी मशिदी आल्या ही गोष्ट खरी, ज्ञानवापीवरुन रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

मुस्लिमसुद्धा आपले बांधव असून त्यांच्या भावनांचा विचार करणे गरजेचे आहे असे रामदास आठवले म्हणाले.

Ramdas Athawale It is true that mosques came in place of temples in some places
काही ठिकाणी मंदिरांच्या जागी मशिदी आल्या ही गोष्ट खरी, ज्ञानवापीवरुन रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

ज्ञानवापी प्रकरणावरुन (Gyanvapi Masjid) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेलं वक्तव्याची चर्चा होत असताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीसुद्धा मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ज्ञानवापी प्रकरणावरील न्यायालयाचा निर्णय आता मान्य केला पाहिजे असे मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. तर काही ठिकाणी मंदिरांच्या जागी मशिदी बांधण्यात आल्या ही गोष्ट खरी असल्याचे रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी म्हटलं आहे. तसेच मोहन भागवत यांनी मांडलेली भूमिका योग्य असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

राम मंदिरासाठी अनेक वर्ष लढा दिला यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि आता चांगल्या प्रकारे काम सुरु आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मशिदीमध्ये शिवलिंग हा इतिहास खरा आहे. एक वेळ अशी होती की, आपला देश बुद्धिस्ट होता त्यानंतर मुघल आले आणि हिंदू लोक मुस्लिम झाले. काही ठिकाणी मंदिरा होते त्या ठिकाणी मशिदी आल्या ही गोष्ट खरी आहे. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील भाजप उभा करायचा आहे. यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये वाद निर्माण करणं योग्य नाही. मुस्लिमसुद्धा आपले बांधव असून त्यांच्या भावनांचा विचार करणे गरजेचे आहे असे रामदास आठवले म्हणाले.

शिवसेनेकडून संभाजीराजेंवर अन्याय

रामदास आठवले यांनी राज्यसभेच्या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आरोप करु नये. उलट शिवसेनेकडून संभाजीराजेंवर अन्याय झाला आहे. तसेच काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होते राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला असे असेल तर त्यांनी महाविकास आघाडीमधून पाठिंबा काठून घ्यावा असा सल्ला आठवले यांनी दिला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये काय निर्णय होईल


हेही वाचा : भाजप तिसरी जागा शंभर टक्के जिंकणार, चंद्रकांत पाटलांना विश्वास