Homeमहाराष्ट्रनाशिक - उ. महाराष्ट्रMahayuti : खातेवाटपावरून महायुतीत तिढा; रामदास आठवलेंकडून फडणवीसांकडे 3 मागण्या

Mahayuti : खातेवाटपावरून महायुतीत तिढा; रामदास आठवलेंकडून फडणवीसांकडे 3 मागण्या

Subscribe

विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजयी झाल्यानंतर महायुतीत आता खातेवाटवावरून तिढा निर्माण झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशातच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीन मोठ्या मागण्या केल्या आहेत.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजयी झाल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घतेली. तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता विशेष अधिवेशन घेत विजयी आमदारांचा शपथविधी पार पडत आहे. मात्र महायुतीत खातेवाटवावरून तिढा निर्माण झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशातच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीन मोठ्या मागण्या केल्या आहेत. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते. (Ramdas Athawale makes three demands to Devendra Fadnavis regarding the issue of portfolio allocation in the Mahayuti)

रामदास आठवले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर मी नाशिक दौऱ्यावर आलो आहे. लोकसभा निवडणुकीत आमचा तोटा झाला, पण आता विधानसभेला आम्हाला मोठे यश मिळाले आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 14 जागांवर महायुतीने विजय मिळवला. कारण मागील काळात महायुती सरकारने चांगले निर्णय घेतले आहेत. त्यात लाडकी बहीण योजना यशस्वी ठरली. मात्र विरोधक संविधान राजकारणात आणत आहे. असे असले तरी संविधान कोणाच्या बापाला बदलता येणार नाही. तसेच मुख्यमंत्रीपदाचा वाद आघाडीत होता, आमच्यात कोणताच वाद नव्हता, असे म्हणत रामदास आठवले यांनी मंत्रिमंडळ विस्ताराप्रकरणी मागण्या केल्या.

हेही वाचा – Rahul Narwekar : संविधान संस्थांवरती हेत्वारोप न करता…; नार्वेकरांचा विरोधकांवर हल्लाबोल

रामदास आठवले म्हणाले की, मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइं पक्षाला स्थान मिळावे, महामंडळ मिळावे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीने एकत्र लढावे. आम्ही सोबत आहोत. आम्हाला पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत योग्य जागा मिळाव्यात, अशा मागण्या रामदास आठवले यांनी केल्या. त्यांनी असेही म्हटले की, मंत्रिमंडळात आमचा मंत्री असेल असे वाटते, त्यामुळे खाते मागितले नाही. कारण, मंत्रीपद मिळण्याची शक्यता वाटत नाही, अशी खंत रामदास आठवले यांनी बोलून दाखवली. रामदास आठवले यांच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस आता काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल.

ईव्हीएम खराब म्हणणाऱ्यांचं डोकं खराब

दरम्यान, विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधक ईव्हीएमवर आक्षेप घेत आहेत, तसेच महायुतीवर निशाणा साधत आहेत. यासंदर्भात रामदास आठवले यांना विचारले असता, ते म्हणाले की, विरोधकांना माझं आवाहन आहे की, त्यांनी रडीचा डाव खेळू नये. तसेच ईव्हीएम खराब म्हणणाऱ्यांचं डोकं खराब आहे. त्यामुळे त्यांनी लोकशाहीचा अपमान करू नये. आम्ही काँगेसच्या काळात ईव्हीएम खराब असल्याचे कधी म्हणालो नाही, असेही आठवले यांनी स्पष्ट केले. तसेच काळाराम मंदिरात बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह आंदोलन केले होते. त्यामुळे 2 ऑक्टोबर सत्याग्रह दिवस हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. याचपार्श्वभूमीवर 2 मार्च रोजी आम्ही धम्म दिवस नाशिकच्या गोल्फ मैदानावर घेण्याचे नियोजन करत आहोत, अशी माहितीही रामदास आठवले यांनी दिली.

हेही वाचा – Eknath Shinde on Sharad Pawar : रडीचा डाव बंद करा, एकनाथ शिंदेंचा शरद पवारांवर पलटवार


Edited By Rohit Patil