घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना एनडीएत येण्याची 'या' नेत्याची ऑफर

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना एनडीएत येण्याची ‘या’ नेत्याची ऑफर

Subscribe

नवी दिल्लीः शरद पवार यांंनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ) यावं, अशी साद पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घातली आहे. नागालॅंडमध्ये जशी रालोआला साथ दिली तशीच केंदात सत्तेत असलेल्या भाजपशीही शरद पवार यांनी जुळवून घ्यावे, असे आवाहनही रामदास आठवले यांनी केले आहे.

रामदास आठवले म्हणाले, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अनेकवेळा शरद पवार यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. त्यामुळे शरद पवार यांनी रालोआमध्ये सहभागी व्हावे.

- Advertisement -

यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. गर्दी जमवण्यात राज ठाकरे तरबेज आहेत. त्यांनी चांगल काम करुन स्वतःचा पक्ष वाढवावा. भोग्यांचा विषय वाढवू नये. मशिदीवरील भोंगे काढण्यापेक्षा मंदिरांवर भोंगे कसे लावता येतील याचा विचार राज यांनी करायला हवा, असा सल्ला रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना दिला.

शिवसेना फुटीवर रामदास आठवले म्हणाले, शिवसेना घालवण्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचाच हात आहे. बाळासाहेब असते तर ही वेळ आली नसती. कॉंग्रेसची अवस्था बिकट आहे. कॉंग्रेसचे नेते भाजपत येत आहेत.

- Advertisement -

राज्यसभेचे खासदार आठवले हे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सध्या भाजपकडून त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे. आपल्या कवितांनी ते नेहमीच चर्चेत राहतात. राज्यसभेतील गंभीर वातावरण आठवले यांच्या कवितांमुळे थोड्या काळासाठी हलके फुलके होते. तरीही आठवले हे सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असतात. त्यांच्या पक्षाचे दोन आमदार नागालॅंडमध्ये निवडून आले आहेत. तेथील भाजपच्या विजयापेक्षा रामदास आठवले यांच्या पक्षाचे आमदार निवडून आले याचीच चर्चा अधिक रंगली होती. आम्ही भाजपला पाठिंबा देणार आहोत. सत्तेचा हिस्सा मागणार आहोत, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी या विजयानंतर दिली होती. या मागणीसाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -