मनसेला मंत्रीपद मिळाल्यास आमचा विरोध; रामदास आठवलेंची भूमिका

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतप शिवसेना आणि भाजपा युतीचे सरकार शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पगाची शपथ घेऊन स्थापन केले. सरकार स्थापन झाले असले तरी, अद्याप मत्रिमंडळाचा विस्तार होणे बाकी आहे.

Gaikwad family of Sandap village refused to help Ramdas Athavale and demanded water

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतप शिवसेना आणि भाजपा युतीचे सरकार शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पगाची शपथ घेऊन स्थापन केले. सरकार स्थापन झाले असले तरी, अद्याप मत्रिमंडळाचा विस्तार होणे बाकी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणत्या आमदारांना स्थान मिळणार याची उस्तुकता सर्वांना लागली आहे. याच पार्श्वभूमिवर आरपीआयचे रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही शिंदे सरकार मध्ये आम्हला मंत्रिपद मिळावं अशी मागणी मांडली होती. मात्र, शिंदेंच्या मंत्रिमंडळात मनसेला मंत्रिपद देण्याबाबत राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. परंतु, यावर रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली असून, मनसेला मंत्रीपद मिळाल्यास आमचा विरोध असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, मंत्रिपद देण्याचा काही विचार होत असेल तर आम्ही विरोध करू असही आठवले म्हणाले. (Ramdas Athawale opposition to MNS in the cabinet RPI wants a place in the cabinet)

कल्याणमधील अत्रे नाट्यगृहात एका खाजगी कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी आपली स्पष्ट भूमिका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, “मनसेला (MNS) मंत्रिमंडळात घेण्याचा काही संबंध नाही. मनसे हा वेगळा पक्ष आहे. तो ना एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे ना आमच्यासोबत! ते निवडणूकीत आमच्यासोबत नव्हते. त्यांना मंत्रिपद दिले तर आमचा विरोध आहे. मंत्रिपद देण्याचा काही विचार होत असेल तर आम्ही विरोध करू.”, असे ते म्हणाले.

“उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला कंटाळून आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यांचा समाचार घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला. दोन तृतीयांश पेक्षाही त्यांच्याकडे जास्त आमदार आहेत त्यामुळे शिंदे गटच खरी शिवसेना आहे. आमचा शिंदे यांना पूर्ण पाठींबा आहे. आरपीआय ज्यांच्या बाजूने असते त्यांना सत्तेवर येण्याची संधी मिळते. आगामी काळात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना आम्ही पाठींबा देऊच पण त्यासोबतच येत्या विधानसभा निवडणुकीत दोनशे जागा जिंकू”, असेही आठवले यांनी यावेळी म्हटले.

“आरपीआयला नक्कीच एखादे मंत्री पद मिळेल सत्तेत सहभाग मिळेल, अधिवेशनापुरत जे मंत्री मंडळ आहे ते शॉर्टमध्ये बनवण्यात येणार आहे, जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा आरपीआयला नक्कीच एखादं मंत्री पद मिळेल. एखादे एमएलसीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात महामंडळ उपाध्यक्ष सभासद नक्की मिळेल”, असेही त्यांनी म्हटले.


हेही वाचा – … तेव्हा लाज वाटली नव्हती का ?, भरतशेठ गोगावलेंचा सवाल