Homeमहाराष्ट्रRamdas Kadam : 'अरे वेड्या, फडणवीसांनी पाच वेळा मातोश्रीवर येण्यासाठी वेळ मागितली,...

Ramdas Kadam : ‘अरे वेड्या, फडणवीसांनी पाच वेळा मातोश्रीवर येण्यासाठी वेळ मागितली, पण…’, कदमांनी ठाकरेंना फटकारलं

Subscribe

Ramdas Kadav On Uddhav Thackeray : वर्षा बंगल्यावर जायची घाई होती म्हणून शिवसेना फुटली, अशी टीका कदमांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या सभेत किती खुर्च्या रिकाम्या होत्या. समोर खुर्च्या रिकाम्या असताना सुद्धा हा उद्धव ठाकरे वेड्यासारखं काय बडबडतोय? हा अमित शहा यांच्यावर बोलतोय, असं म्हणत शिवसेना ( शिंदे गट ) नेते, रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरेंनी आता एकनाथ शिंदेंवर बोलणे थांबवायला हवे. त्यांनी स्वत:चे आत्मपरिक्षण केले पाहिजे, असा सल्लाही रामदास कदम यांनी दिला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

‘आज माझ्याकडे काहीच नाही. पण, मी शिवसैनिकांच्या ताकदीवर जिद्दीनं उभा आहे. मी मैदाना सोडन तर जिंकूनच सोडेन. गद्दारांच्या हातून मी हार मानणार नाही. ज्याने पाठीत वार केले ते गद्दार आणि त्यांचा वरदहस्त महाराष्ट्रात दिसायला नको. मला सूड उगवायचा आहे,’ असं म्हणत शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी अंधेरीत झालेल्या मेळाव्यातून हल्लाबोल केला होता. याला आता रामदास कदम यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा : सर्वसामान्यांना मोठी झळ! लालपरीचा प्रवास महागला, रिक्षा आणि टॅक्सीचीही भाडेवाढ

रामदास आठवले म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना चांगल्या डॉक्टरची गरज आहे. नियतीनं ठाकरेंना धडा शिकवला आहे. 90 उमेदवार उभे केले होते. फक्त 20 आमदार निवडून आले. ते देखील राहतील की नाही, अशी शंका आहे. त्यातून उद्धव ठाकरेंना वैफल्य आलेले आहे. वैफल्यातून ठाकरेंची बडबड सुरू आहे, असं म्हटलं तर चुकीचं वाटणार नाही.”

“उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना, ‘रूसू बाई रूसू आणि गावात जाऊन बसू.’ पण, एकनाथ शिंदे हे शेतकऱ्याचा मुलगा आहेत. गावात शेती आहे. शेती करण्यासाठी गावाला जातात, हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र, उद्धवजी, आपण लंडनला कशासाठी जाता? ‘महाराष्ट्रात मिठाईचे खोके गोळा करून घेऊ आणि लंडनमध्ये जाऊन बसू’ असं काही आहे का आपलं? तुमचं काय आहे ते बघा?” अशा शब्दांत रामदास कदम यांनी सुनावलं आहे.

“उद्धव ठाकरेंनी आता एकनाथ शिंदेंवर बोलणे थांबवायला हवे. त्यांनी स्वत:चे आत्मपरिक्षण केले पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला कल्पना आहे की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटपर्यंत कुठलेही पद घेतलं नाही. त्यांनी रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवला. उद्धव ठाकरे एवढे स्वार्थी आहेत, त्यांना मुख्यमंत्रिपदावर बसायचे होते. वर्षा बंगल्यावर जायची घाई होती म्हणून शिवसेना फुटली,” अशी टीका रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

“उद्धव ठाकरेंच्या सभेत किती खुर्च्या रिकाम्या होत्या. समोर खुर्च्या रिकाम्या असताना सुद्धा हा उद्धव ठाकरे वेड्यासारखं काय बडबडतोय? हा अमित शहा यांच्यावर बोलतोय. अरे वेड्या, देवेंद्र फडणवीसांनी पाच वेळा ‘मातोश्री’वर येण्यासाठी वेळ मागितली होती. ‘उद्धवजी, मला भेटायला यायचे आहे,’ असं फडणवीसांनी म्हटलं. हे ( उद्धव ठाकरे ) म्हणाले, ‘नाही. माझे दरवाजे तुमच्यासाठी बंद आहेत.’ अरे तुमचे दरवाजे बंद केले. मग आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर लाचारासाखे पुप्षगुच्छ घेऊन भेटायला कशाला गेला होता? सगळी लाज गुंडाळली का? शिवसेनाप्रमुखांचे चिरंजीव आहात, थोडी जनाची नाही, तर मनाची ठेवायला पाहिजे. शिवसैनिकांना खूश करण्यासाठी बेफाम वक्तव्ये करतात. महाराष्ट्राच्या जनतेनं यांचा सुफडासाफ केला आहे,” असा हल्लाबोल रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

हेही वाचा : कुडाळमध्ये ठाकरेंना धक्का! नगरपंचायतीवर भाजपने फडकविला झेंडा; एका नगरसेविकेने गेम केला