घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून भाजपा-शिवसेनेत रस्सीखेच; रामदास कदमांची टीका

Lok Sabha 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून भाजपा-शिवसेनेत रस्सीखेच; रामदास कदमांची टीका

Subscribe

उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे जागावाटपात ही जागा शिवसेनेकडून ठेवून किरण सामंतांना मिळवण्यासाठी उदय सामंताचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई : सर्व पक्षाला संपवून एकट्या भाजपाला जिवंत राहायचे आहे का? असा सवाल शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर रामदास कदम यांनी भाजपावर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजू शकते. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपाची आहे, असा दावा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून भाजपा-शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे.

रामदास कदम म्हणाले, “तुम्ही रायगड आणि रत्नागिरीला देखील आम्ही लढणार असे सांगाल. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची विद्यमान खासदार हा शिवसेनेचा आहे. तुम्हाला सगळ्या पक्षाला संपवून भाजपाला एकट्याला जिवंत राहायचे आहे का? असा निष्कर्ष निघेल. आपण दोघे भाऊ भाऊ तुझा आहे, ते वाटून खाऊ आणि माझ्या याला हात नको लावू. पण, असे होते नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही रत्नागिरीची देखील जागा सोडणार नाही, आम्ही ती लढवणार आमचे आहे. आमच्या हक्काचे आहे. आता जे खासदार विनायक राऊत आहेत. मागच्या वेळेला त्यांच्या प्रचार करता सावंतवाडी शेवटची प्रचार सभा मी घेतली होती”, असे रामदास कदम म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : मुंबईतील गँगवॉरप्रमाणेच शिंदे गटातही तेच – संजय राऊत

राज्यसभा निवडणुकीत नारायण राणेंना उमेदवारी दिली नाही. पण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उभे मिळण्याची शक्यात वर्तवली आहे. पण हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा असल्याचा दावा राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. कारण उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे जागावाटपात ही जागा शिवसेनेकडून ठेवून किरण सामंतांना मिळवण्यासाठी उदय सामतांचे प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : …तर गोरगरीब जनतेचे काय ऐकतील? सुषमा अंधारेंची सत्ताधाऱ्यांवर टीका

भाजपा जागा लढवणार – नारायण राणे

नारायण राणेंनी गुरुवारी (29 फेब्रुवारी) ट्वीट करत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागा भाजपा लढणार आहे, असे स्पष्ट केले आहे. नारायण राणेंनी ट्वीटमध्ये म्हणाले, “लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्‍या जागेसंबंधी आपला हक्‍क दाखवित आहेत. रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असून भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -