घरताज्या घडामोडीअनिल परबांच्या रिसॉर्टची माहिती रामदास कदम यांनी पुरवली ? ऑडिओ क्लिप व्हायरल

अनिल परबांच्या रिसॉर्टची माहिती रामदास कदम यांनी पुरवली ? ऑडिओ क्लिप व्हायरल

Subscribe

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टबाबतच्या माहितीच्या निमित्ताने एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. अनिल परब यांच्या सीआरझेड झोनमधील रिसॉर्टची माहिती ही शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे आमदार रामदास कदम यांनीच पुरवल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. रामदार कदम यांचे पीए प्रसाद कर्वे आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील संभाषण व्हायरल झाले आहे. या संपुर्ण घटनेवर शिवसेना नेते रामदास कदम यांनी न्यूज १८ लोकमत या वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर होणारे आरोप धादांत खोटे आहेत. केवळ पक्षात माझी बदनामी करण्यासाठीचे हे षडयंत्र आहे, असेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले आहे. लवकरच संजय कदम आणि वैभव खेडेकर यांच्यावर न्यायालयात दावा ठोकणार असल्याचेही ते म्हणाले. रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे याच्याशीही माझा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

वैभव खेडेकर आणि संजय कदमने असे आरोप करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही पत्रकार परिषदेत त्यांनी आरोप केले होते. यापेक्षाही अनेक आरोप पत्रकार परिषदेत केले होते. माझ्यावर आरोप केल्याने त्यांना महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळते. त्यामुळेच वारंवार आरोप करण्याचे प्रकार घडतात. मी त्यांना या आरोपांच्या प्रकरणात नोटीस देणार आहे. नोटीशीनंतर माफी मागितली नाही तर दावा ठोकणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संपुर्ण प्रकरणात अनिल परब किंवा पक्षाकडे कोणाचेही बोलणे झालेले नाही. मला त्याची आवश्यकता वाटत नसल्याचेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

संजय कदमला माझ्या मुलाने निवडणूकीत पाडल्यानेच त्याने आरोप केले आहेत. तर वैभव खेडेकर विरोधात नगर परिषदेतील प्रकरणाच्या निमित्ताने मी वारंवार विधान परिषदेत आवाज उठवला आहे. त्यामुळेच खेडेकरकडून आरोप होत आहेत. येत्या दिवसांमध्ये त्याचे पद रद्द होण्याच्या मार्गावर असल्यानेच त्याने आरोप केले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -