घरताज्या घडामोडीहकालपट्टीसाठी वेगळी समितीच नेमावी, रामदास कदमांनी उडवली खिल्ली

हकालपट्टीसाठी वेगळी समितीच नेमावी, रामदास कदमांनी उडवली खिल्ली

Subscribe

राज्याचे राज्य मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना नेतृत्वाबाबत खिल्ली उडवली आहे. हकालपट्टीसाठी आता वेगळी समितीच नेमावी, असा टोला रामदास कदम यांनी शिवसेनेला लगावला आहे. तसेच बाळासाहेबांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला हे लवकरच उघड करणार, असा इशारा देखील कदमांनी शिवसेनेला दिला आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत प्रामुख्याने दोन गट पडले आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक गट आणि दुसरा गट उद्धव ठाकरे यांचा आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील आमदार, खासदार तसेच शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दर्शविलेला आहे. त्यामुळे शिंदे गटाला पाठिंबा दर्शविणाऱ्या पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

- Advertisement -

रामदास कदमांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचीही हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे कदम भावूक झाले आणि शिवसेनेसाठी एवढी वर्षे काम केल्यानंतरही झालेली हकालपट्टी चुकीची असल्याचे देखील त्यांनी माध्यमांसमोर सांगितले. मात्र, त्यांची हकालपट्टी केल्यानंतरही शिंदे गटातून पुन्हा कदम यांना शिवसेना नेतेपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, अनेक कार्यकर्ते शिंदे गटाकडे येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे हकालपट्टीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगळी समिती नेमावी, असा सल्ला कदम यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना दिला आहे.

- Advertisement -

पक्ष विरोधी कारवाईचा ठपका ठेवत नागपूर ग्रामीणच्या जिल्हाप्रमुखाची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. संदीप इटकेलवार यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. इटकेलवार नागपूर ग्रामीणचे जिल्हाप्रमुख होते. शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे संदीप इटकेलवार यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


हेही वाचा : सबका साथ, सबका विकास एक धोका, ओवैसींचा मोदी सरकारवर आरोप


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -