‘या’ वेळी उद्धव ठाकरेंच्या सभेचं निमंत्रण पण उपस्थित राहणार नाही, रामदास कदमांची प्रतिक्रिया

Ramdas Kadam said i got invitation for Uddhav Thackeray sabha but will not be present at this time
'या' वेळी उद्धव ठाकरेंच्या सभेचं निमंत्रण पण उपस्थित राहणार नाही, रामदास कदमांची प्रतिक्रिया

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचं निमंत्रण देण्यात आले आहे. परंतु उपस्थित राहणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिली आहे. शिवसेना दसरा मेळाव्याचे रामदास कदम यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरोधात माहिती दिली असल्याचा आरोप रामदास कदम यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे शिवसेनेतील नेते रामदास कदम यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जाते. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचं निमंत्रण मिळाले आहे. पण उपस्थित राहणार नाही असे रामदास कदम यांनी सांगितले आहे.

शिवसेना नेते रामदास कदम यांनी आपल्याला सभेला बोलवले असल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप मिळाला आहे. १४ मे रोजीच्या शिवसेनेच्या सभेसाठी बोलावले आहे. परंतु त्या सभेला आपण उपस्थित राहणार नाही. मात्र नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वतः भेटणार असल्याचे कदम यांनी सांगितले. शिवसेनेत दोन गट पडले असून यातील एक गट कदम यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे त्यांना शिवसेना दसरा मेळाव्याला निमंत्रण देण्यात आले नव्हते अशी चर्चा होती. परंतु आता सभेचं निमंत्रण असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले आहे.

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री यांच्याविरोधात पुरावे दिले असल्याचा आरोप रामदास कदम यांच्यावर आहे. अनिल परब यांच्या संबंधित एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये रामदास कदम यांचा आवाज असून ते अनिल परब यांच्याविरोधात माहिती देत आहेत. परंतु हा क्लिपमधील आवाज आपला नसल्याचे कदम यांनी सांगितले आहे. दरम्यान रामदास कदम अनिल परब यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

शिवसेना नेते रामदास कदम यांनी यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. अनिल परब राष्ट्रवादीच्या माध्यमातून दापोलीत शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केली आहे. तसेच आपल्याला व मुलगा आमदार योगेश कदमला जिल्ह्यात काम करण्यास देत नाहीत. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अनिल परब जिल्ह्यात काम करत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला होता.


हेही वाचा : मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीच्या नावे सासरे, मेहुण्यांनी केल्या कोट्यवधींच्या मिळकती