घरताज्या घडामोडीतुमच्या कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत तर जनतेला कसं सांभाळणार?, रामदास कदमांचा सवाल

तुमच्या कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत तर जनतेला कसं सांभाळणार?, रामदास कदमांचा सवाल

Subscribe

उद्धव ठाकरेंना मला एक प्रश्न विचारायचा आहे की, बिंदू माधव आज आपल्यात नाहीयेत. ते स्वर्गवासी झाली. त्यांचे चिरंजीव आज एकनाथ शिंदेंसाठी न्यायालयीन लढाई लढत आहेत. उद्धव ठाकरेंचे बंधू येथे जयदेव ठाकरे येथे येऊन गेले आणि त्यांना आशीर्वाद दिला. तुमचे चुलत बंधू राज ठाकरे आज तुमच्यासोबत नाहीयेत. मग तुम्ही तुमच्या कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत. तर महाराष्ट्राच्या जनतेच्या कुटुंबाला कसं काय सांभाळणार आहात, त्याचं उत्तर तुम्हाला आज या जनतेला द्यावं लागेल, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

अनेक पावसाळे मी पाहिले आहेत. उद्धव ठाकरेंना दुसरा कोणताही कार्यकर्ता मोठा झालेला बघवत नाही. तो कार्यकर्ता मोठा होतोय असं पाहिलं की, त्याला संपवून टाकण्याची निती उद्धव ठाकरेंकडे आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याकडून जिल्हाप्रमुखांचा राजीनामा मागितला होता की नाही, हे एकनाथ शिंदेच सांगतील. हे किती लोकांना माहिती आहे. दिघे साहेब मोठे होत आहेत हे म्हटल्यानंतर त्यांचा राजीनामा मागितला होता. मी त्याचा साक्षीदार आहे, असं रामदास कदम म्हणाले.

- Advertisement -

गुलाबराव पाटलांना भाषणात जोरजोरात टाळ्या मिळतात. त्यामुळे त्यांना भाषणात बोलवू नका. एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांकडून धमकी आली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते. ताबडतोब एकनाथ शिंदेना झेड सुरक्षा देण्याचा आदेश आला. शंभूराज देसाईंना सकाळी आठ वाजता उद्धव ठाकरेंचा फोन आला की, एकनाथ शिंदेंना झेड सुरक्षा देऊ नका. हे उद्धव ठाकरेंचं वास्तव आहे, असं कदम म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर माझी शिवाजी पार्कातील भाषणं बंद करून टाकली. मला सांगितलं की, तुम्ही यापुढे कधीही मिडियासमोर जाऊ नका. एक-एक नेत्याला संपवून टाकायचं अशी त्यांची भूमिका होती. हे ४०-५० आमदार का शिंदे गटात गेले?, असा सवाल रामदास कदमांनी उपस्थित केला.

- Advertisement -

तुम्ही कधीही मंत्रालयात गेला नाहीत. अडीच वर्षात तीन वेळा मंत्रालयात गेलात. अजित पवार सकाळ-संध्याकाळ मंत्रालयात बसून फक्त राष्ट्रवादीला पैसे वाटत होते. शंभरचा लक्ष त्यांनी ठेवलं होतं. शिवसेना संपवून टाकायची हे त्यांचं लक्ष होतं. आपण काय केलंत. आमदार आपल्याला भेटायला सांगतात. पण तुम्ही आमदार, मंत्री आणि नेत्यांनाही भेट देत नाहीत. मग आता तुम्ही कुणाला दोष देत आहात. खरा गद्दार कोण, असं कदम म्हणाले.

तुमच्या मुलाला आमदार करण्यासाठी दोन आणखीन आमदार त्यांना द्यावे लागले होते. मग एक-एक आमदार आपल्या ताकदीवर कसा निवडून येत आहे. त्यावरून समोर दिसत आहे, असही कदम म्हणाले.


हेही वाचा : मी कुणाच्या गोठ्यात बांधला जाणारा ठाकरे नाही – जयदेव


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -