घर महाराष्ट्र रामदास कदमांचे सख्खे भाऊ, पुतणे सभेला उपस्थित, पण त्यांच्या डोळ्यांवर झापडं; संजय...

रामदास कदमांचे सख्खे भाऊ, पुतणे सभेला उपस्थित, पण त्यांच्या डोळ्यांवर झापडं; संजय कदमांचे टीकास्र

Subscribe

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन आठवड्यांपूर्वी (५ मार्च) खेडमध्ये सभा घेतली होती. या सभेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमधील त्याच गोळीबार मैदानावर आज सभा होणार आहे. या पाश्वभूमीवर दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर खेडमधील माजी आमदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय कदम यांनी रामदास कदमांवर टीकास्र सोडले आहे.

खेडमध्ये झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेत संजय कदम यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता. आज एकनाथ शिंदेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय कदम यांनी टीव्ही ९ शी बोलताना खोचक शब्दांत रामदास कदमांना लक्ष्य करताना त्यांचे पुत्र योगेश कदम यांनाही सल्ला दिला आहे.

- Advertisement -

संजय कदम म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या खेडच्या सभेला त्यांचे सख्खे भाऊ, त्यांचे पुतणे, गावातील सरपंच, शाखाप्रमुख आले होते, हे स्थानिक लोकांना माहित आहे. पण रामदास कदमांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याने त्यांना स्थानिक आणि बाहेरचे यातला फरक समजत नाही, असा टोलाही संजय कदम यांनी लगावला आहे.

रामदास कदम नावाचा बाल्या शिल्लक
एकेकाळी खेड हा रामदास कदम यांचा बालेकिल्ला होता. परंतु आता फक्त रामदास कदम नावाचा बाल्या शिल्लक आहे. बाकी किल्ला कधीच हातातून निसटल्यामुळेच ते सातत्याने काहीतरी बोलत असतात. योगेश कदम कधी गावचा सरपंच, पंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य झालेला नाही. त्यामुळे त्याला खेडमधलं काही माहीत नाही. पण योगेश कदमच्या पाठिशी चार वर्षं त्याचा बाप आहे. त्याची आमदारकी वडीलांच्या पर्यावरण विभागात खाल्लेल्या पैशातून आली आहे. मात्र मी जिल्हा परिषद सदस्य, पंचायच समिती, सरपंच ते आमदार झालो आहे, असेही संजय कदम म्हणाले.

- Advertisement -

कदमांनी भास्कर जाधवांविरोधात निवडणूक लढवावी
रामदास कदम २००९ मध्ये खेडमधून पराभूत झाले होते. भास्कर जाधवांनी त्यांचा दारूण पराभव केला होता. या पराभवानंतर भास्कर जाधव यांच्यासोबत खेड, गुहागर जोडला गेला. त्यामुळे इतर कोणाची नाव सांगण्यापेक्षा रामदास कदमांनीच खेडमधून भास्कर जाधवांच्या विरोधात निवडणूक लढवावी, म्हणजे डिपॉझिटही जप्त होईल, असा टोलाही संजय कदम लगावला.

- Advertisment -