घरमहाराष्ट्ररमेश बैस यांनी मराठी भाषेतून घेतली राज्यपालपदाची शपथ

रमेश बैस यांनी मराठी भाषेतून घेतली राज्यपालपदाची शपथ

Subscribe

राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी रमेश बैस यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली.

भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर त्यांना शुक्रवारी (ता. 17 फेब्रुवारी) राजभवन परिसरात निरोप देण्यात आला. तर आज महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल रमेश बैस यांचा राजभवन परिसरात शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते. तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना शपथ दिली. रमेश बैस यांनी यावेळी मराठी भाषेमधून राज्यपाल पदाची शपथ घेतली.

भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल असताना अनेक वादग्रस्ते वक्तव्ये केली होती. ज्यामुळे राज्यात त्यांच्याविषयी जनतेच्या मनात तीव्र नाराजी पाहायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत देखील भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त अशी वक्तव्ये केली होती. ज्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी विरोधकांनी त्यांच्याविरोधात मोर्चे काढले होते. जनतेमधील रोष पाहता भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर गेल्या आठवड्यात रमेश बैस यांची राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

- Advertisement -

जाणून घ्या, रमेश बैस यांच्या राजकीय प्रवास
रमेश बैस हे 1978 मध्ये रायपूरच्या नगरपालिकेत पहिल्यांदा निवडून आले होते. त्यांनी 1980 ची विधानसभा निवडणूक मंदिर हसद मतदारसंघातून जिंकली, परंतु 1985 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सत्यनारायण शर्मा यांनी त्यांचा पराभव केला.

त्यांनी 1999 पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभारी) म्हणून काम केले होते. ते रायपूरमधून 9व्या (1989), 11व्या (1196), 12व्या, 13व्या, 14व्या (2004), 15व्या आणि 16व्या लोकसभेसाठी निवडून आले होते. त्यांनी पोलाद, खाण, रसायने आणि खते, माहिती आणि प्रसारण आणि खाण आणि पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांसारख्या विविध खात्यांमध्ये काम केलेले आहे. तसेच झारखंडाचे 10वे राज्यपाल म्हणून देखील कार्यरत राहिलेले आहे. तर 2019 मध्ये रमेश बैस यांनी त्रिपुराचे 18वे राज्यपाल म्हणून देखील काम केलेले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ठाकरे गटातील मराठवाड्यातील आणखी एक खासदार शिंदे गटाच्या वाटेवर

भाजप पक्षाचा एक सामान्य आणि एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून देखील रमेश बैस यांची ओळख आहे. छत्तीसगढचे मध्य प्रदेशमधून विभाजन होण्याअगोदर त्यांनी मध्य प्रदेशचे आमदार म्हणूनही काम पाहिले आहे. रमेश बैस हे लालकृष्ण अडवाणी यांचे निकटवर्तीय समजले जातात आणि त्याचमुळे 2019 च्या निवडणुकीमध्ये त्यांना भाजपकडून तिकीट देण्यात आले नाही, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येते. तर दुसरीकडे 2019 मध्ये लोकसभेचे तिकीट न देता रमेश बैस यांना लोकसभेच्या निवडणुका पार पडताच त्रिपुरा राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आले होते. तसेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत सुषमा स्वराज आणि रमेश बैस यांचे भाव-बहिणीचे नाते होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -