घरमहाराष्ट्ररमेश लटकेंचा वारसा पुढे घेऊन जाणार, कोर्टाच्या निर्णयानंतर ऋतुजा लटकेंची प्रतिक्रिया

रमेश लटकेंचा वारसा पुढे घेऊन जाणार, कोर्टाच्या निर्णयानंतर ऋतुजा लटकेंची प्रतिक्रिया

Subscribe

माझा न्यायदेवतेवर पूर्णपणे विश्वास होता, म्हणूनच मी कोर्टात आले होते आणि आज सुनावणी झाली. तो न्याय मला मिळालेला आहे. जसं माझे पती रमेश लटके यांनी जे कार्य केलेले आहे. त्यांचा जो वारसा आहे तो मी पुढे घेऊन जाणार आहे

मुंबईः जसे माझे पती रमेश लटके यांनी जे कार्य केलेले आहे. त्यांचा जो वारसा आहे तो मी पुढे घेऊन जाणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून मशाल या चिन्हावर मी निवडणूक लढवणार आहे, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके म्हणाल्यात. उच्च न्यायालयाने ऋतुजा लटकेंना दिलासा दिल्यानंतर त्या माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या.

माझा न्यायदेवतेवर पूर्णपणे विश्वास होता, म्हणूनच मी कोर्टात आले होते आणि आज सुनावणी झाली. तो न्याय मला मिळालेला आहे. जसं माझे पती रमेश लटके यांनी जे कार्य केलेले आहे. त्यांचा जो वारसा आहे तो मी पुढे घेऊन जाणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून मशाल या चिन्हावर मी निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झालेल्या ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा आहे. उद्या सकाळी 11 पर्यंत राजीनामा स्वीकारल्याचं पत्र द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. यामुळे ऋतुजा लटके यांना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवता येणार आहे.

- Advertisement -

आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने अंधेरी पूर्व विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या ठिकाणी आता पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्याने या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. शिंदे गटाने केलेल्या खेळीमुळे ठाकरे गट चांगलाच अडचणीत आला आहे. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, त्या मुंबई पालिकेच्या कर्मचारी असल्याने त्यांना महिनाभर आधी राजीनामा देणे बंधनकारक आहे. आता यावरूनच कलगीतुरा रंगलेला आहे.

ऋतुजा यांनी 2 सप्टेंबर रोजीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण राजीनामा पत्रात त्रुटी असल्याचं सांगण्यात आलं. लटके यांनी पुन्हा ३ ऑक्टोबर रोजी नव्यानं राजीनामा दिला. पण त्या अर्जावर अद्याप कोणताही निर्णय पालिका अधिकाऱ्यांनी घेतलेला नाही. राजीनामा स्वीकारण्यासाठी ऋतुजा लटके यांनी काल स्वतःहून महापालिका आय़ुक्तांचीही भेट घेतली. आयुक्तांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. आज या याचिकेवर सुनावणी झाली.

- Advertisement -

हेही वाचा: ऋतुजा लटकेंना न्यायालयाचा दिलासा, राजीनामा मंजूर करण्याचे आदेश

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -