Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नागरिकांच्या पुढाकारानेच शहर स्वच्छ होईल!

नागरिकांच्या पुढाकारानेच शहर स्वच्छ होईल!

Subscribe

फलटण शहरात स्वछतेबाबत नगरपालिका दक्षता घेत असली तरी नागरिकांनी स्वत:हून स्वछतेबाबत पुढाकार घेतल्यास आपले फलटण शहर 100% स्वच्छ आणि सुंदर होईल अशी अपेक्षा विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली. स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत फलटण शहरात लोकसहभागातून महास्वच्छता अभियान राबविन्याचा शुभारंभ संपूर्ण फलटण शहरात नगरपालिकेच्या वतीने आणि विविध सामाजिक संस्था, संघटना, शालेय विद्यार्थी, पत्रकार, यांच्यां सहकार्याने करण्यात आला याचा शुभारंभ प्रत्यक्ष नगरपालिका समोर रामराजे यांच्या शुभहस्ते कचरा साफ करून करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कचरा उचलण्यापेक्षा, कचरा योग्य ठिकाणी टाकण्यासाठी आाणि कचरा न करण्यासाठी जनजागृती आवश्यक असून महास्वच्छता अभियानाद्वारे याकामी पुरेसा लोक सहभाग मिळविता आला तर योग्य जनजागृतीद्वारे स्वच्छ सर्वेक्षण अभियानांर्गत प्रथम क्रमांक प्राप्त करणे फलटणकरांना सहज शक्य होईल, असा विश्‍वास सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत फलटण शहरात लोकसहभागातून महास्वच्छता अभियान आज विविध प्रभागात 8 ते 11 यावेळेत राबविण्यात आले त्याच्या नियोजनासाठी शहराच्या विविध भागात ठेवण्यात आलेल्या कचरा कुंड्या काढण्यात आल्या असून घंटागाडीद्वारे संपूर्ण शहरातील ओला व सुका कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले होते प्रत्येक प्रभागात ज्या त्या नगरसेवकानी नागरिकांना सोबत घेऊन स्वछता मोहिम राबविली प्रत्येक प्रभागात जाऊन संजीवराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा निताताई नेवसे यांनी आढावा घेतला.स्वच्छता मोहीमे विविध शाळा, पत्रकार संघटना, सामाजिक संस्था यांनी आजच्या महास्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -