लिलावती रुग्णालयाला नोटीस देणं दुर्दैवी, राणा दाम्पत्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

Rana couple targets CM Uddhav Thackeray on bmc sending notice to lilavati hospital
लिलावती रुग्णालयाला नोटीस देणं दुर्दैवी, राणा दाम्पत्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

खासदार नवनीत राणा यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले. यावेळी वैद्यकीय चाचण्या करताना आणि एमआरआय करतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी लिलावती रुग्णालयाला धारेवर धरलं होते. तसेच मुंबई महानगरपालिकेकडून लिलावती रुग्णालयाला नोटीस देण्यात आली आहे. पालिकेने आमच्या घरावर कारवाई केली परंतु लिलावती रुग्णालयाला नोटीस देणं दुर्देवी असल्याची टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे.

आमदार रवी राणा यांनी लिलावती रुग्णालयाला देण्यात आलेल्या नोटीसवरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. पाहिले नवनीत राणा यांनी जेलमध्ये पाठीचा आणि स्पाँडेलायसिसचा त्रास होत असल्याचे सांगितले होते. त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले परंतु मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस होते. शेवटी नवनीत राणा यांची सुटका झाल्यानंतर लिलावती रुग्णालयात दाखल झाल्या सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. पूर्ण आपल्या प्रकृतीची चाचणी करुन डॉक्टरांचा उपचार घेतला. परंतु पालिकेची नोटीस लिलावती रुग्णालयाला गेली. नवनीत राणा यांनी एमआरआय मुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांना सांगण्यात आले होते का, नवनीत राणा यांच्या एमआरआयची चौकशी करा. है दुर्दैवी आहे. माझे घर पाडलं तर मला पर्वा नाही परंतु लिलावती रुग्णालय हे रुग्णालय आहे. परंतु त्याला जर तुम्ही नोटीस देत असाल तर हे कोणत्या अधिकारात दिलं आहे, असा सवाल रवी राणा यांनी केला आहे.

मुंबई भ्रष्टाचारमुक्त करणार

मुंबई महानगरपालिकाच्या माध्यमातुन जी नोटीस देण्यात आली आहे. जी इमारत २००७ मध्ये बांधली गेली आहे. त्याच्यानंतर ७ ते ८ वर्षानंतर आम्ही फ्लॅट घेतला आहे. संपूर्ण मुंबईत आमचं एकच घर आहे. अनिल परब यांचे मुंबईत ७ ते ८ फ्लॅट आहेत. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पालिकेत भ्रष्टाचार करुन मुख्यमंत्र्यांच्या करोडो रुपयांची मालमत्ता आहे. आमचा एकच फ्लॅट आहे. पालिकेना बिल्डर्सला परवानगी दिली. ओसी दिली. प्लानला मंजूरी देण्यात आली. तेव्हा शिवसेनेची सत्ता होती. महापौर शिवसेनेचा होता. आता १५ वर्षानंतर मुंबई पालिकेची नोटीस जर उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन नोटीस देण्यात आली आहे. आमचे घर बंद असताना आमच्या घरावर नोटीस लावणे एवढ्या खालच्या पातळीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उतरत असतील. जर खऱ्या अर्थाने एका महिला खासदाराला आणि आमदाराला त्रास देत असतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जी भ्रष्टाचाराची लंका असलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी आम्ही उतरु आणि मुंबईकरांना भ्रष्टाचारातून मुक्त करण्याचे काम आम्ही करणार आहे.

नवनीत राणा संसदीय समितीसमोर मत नोंदवणार

या संदर्भात आम्ही ओम बिर्ला जी यांनासुद्धा भेटलो आहे. २३ मे रोजी खासदार नवनीत राणा यांचे लेखी जबाब घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना बढतीचे लालच देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले असावेत. यातून त्यांनी आम्हाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्याबाबत तक्रार केली असून न्याय मागण्यात आला आहे. याबाबत २३ तारखेला नवनीत राणा आपले मत संसदीय समितीसमोर आपलं मत मांडतील. असे रवी राणा म्हणाले आहेत.


हेही वाचा : केंद्र सरकारला देव सुबुध्दी देवो, सुप्रिया सुळेंचा टोला