घरमहाराष्ट्रशरद पवार आदरणीय होते आणि राहतील - जगजित सिंह

शरद पवार आदरणीय होते आणि राहतील – जगजित सिंह

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबत असणारे डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

शरद पवारांचे निकटचे सहकारी आणि राष्ट्रवादी पक्षस्थापनेपासून त्यांच्यासोबत असणारे डॉ. पद्मसिंग पाटील आणि त्यांचे चिरंजीव आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं अखेर जाहीर केलं. उस्मानाबादमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संवाद साधत असताना त्यांनी ही घोषणा केली. या घोषणेमुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पद्मसिंह आणि जगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी श्रीरामपूर दौऱ्यादरम्यान पद्मसिंह पाटलांविषयी प्रश्न विचारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एका पत्रकारावर चांगलेच भडकले होते.

‘चौकशीला घाबरून भाजपप्रवेश नाही’

यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजप प्रवेसाचं कारण स्पष्ट केलं. ‘माझ्या वडिलांवर (पद्मसिंह पाटील) असलेल्या हत्याकांडाच्या केसच्या चौकशीला घाबरून आम्ही अजिबात भाजपमध्ये जात नाहीये. पण उस्मानाबादला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून उस्मानाबादच्या विकासाची प्रक्रियाच ठप्प झाली आहे. कृष्णा कोऱ्यातलं हक्काचं पाणी अजून मिळालेलं नाही, उद्योग आले नाहीत. सगळ्यांचा विकास होत असताना त्यात उस्मानाबाद मागे राहू नये, म्हणून काळजावर दगड ठेवत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला’, असं जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं. तसंच, ‘शरद पवार आमच्यासाठी कायमच आदरणीय होते, आहेत आणि राहतील’, असं देखील जगजितसिंह यांनी यावेळी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवार पत्रकारावर भडकले, माफी मागायला भाग पाडले!

श्रीरामपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाविषयी विचारणा केली असता शरद पवार पत्रकारावर चांगलेच भडकले. इतकंच नाही, तर या प्रश्नाबद्दल त्यांनी संबंधित पत्रकाराला माफी देखील मागायला लावली. ‘राजकारणात नातेवाईकाचा संबंध काय?’ असा उलट प्रश्नच त्यांनी सदर पत्रकाराला विचारला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -