घरताज्या घडामोडीआम्हाला संपवणं अशक्य, विरोधकांना अनेक जन्म घ्यावे लागतील; राणे कुटुंबियांची प्रतिक्रिया

आम्हाला संपवणं अशक्य, विरोधकांना अनेक जन्म घ्यावे लागतील; राणे कुटुंबियांची प्रतिक्रिया

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून नारायण राणे यांची वर्णी लागली आहे. नारायण राणे यांनी नुकतीच मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावेळी राणे यांच्या कुटुंबियांनी एकच जल्लोष केला. नारायण राणे यांची शपथ घेतल्यानंतर त्यांचे दोन्ही पुत्र निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. त्यावेळेस निलेश राणे म्हणाले की, ‘आम्हाला संपवणं अशक्य आहे. राणे कुटुंबियांना संपवण्यासाठी विरोधकांना अनेक जन्म घ्यावे लागतील.’

नारायण राणे चोख जबाबदारी पार पाडतील – निलेश राणे 

‘आजचा मोठा दिवस असून खूप चांगला दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा यांनी नारायण राणे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. जेव्हा जेव्हा नारायण राणे यांच्या अंगावर जबाबदारी आली त्या जबाबदारीला १०० टक्के न्याय देण्याचं काम त्यांनी केलं आहे. यावेळेस ही तसंच होईल अशी माझी खात्री आहे. मुख्यमंत्री होताना ते अचानक झाले होते, बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्व कल्पना देऊन नारायण राणे यांना मुख्यमंत्री पद दिलं नव्हतं. आजपर्यंत अनेक अधिकारी, कार्यकर्ते हे साहेबांचा तेव्हाचा मुख्यमंत्री काळ आठवतात. नारायण राणे यांची काम करण्याची पद्धत तशी राहिली आहे. जबाबदारी गांभीर्याने घेणे आणि ही देशाची सेवा आहे. त्या अनुषंगाने नारायण राणे यांनी प्रत्येक पदाला गांभीर्याने घेतलं. आताही तसंच होईल. या गोष्टीसाठी काही वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून नारायण राणे यांना जी जबाबदारी मोदींनी दिली आहे, ती चोख बजावतील, त्याच्यात शंका नाही’, असे निलेश राणे म्हणाले.

- Advertisement -

पुढे निलेश राणे म्हणाले की, ‘आम्हाला संपवणं अशक्य, विरोधकांना अनेक जन्म घ्यावे लागतील राणे कुटुंबियांना संपवण्यासाठी. त्यामुळे राणे कुटुंबियांना संपवणं हे काय शक्य नाही. आमच्या समोर आल्यावर कढी पातळ होते.’

नितेश राणे यांची प्रतिक्रिया 

आमदार नितेश राणे म्हणाले की, ‘राणे कुटुंबियांच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि सगळ्या प्रमुख नेत्यांचे आभार मानतो. राणे कुटुंबियांसाठी हा सुवर्णक्षण आहे. पण त्याच्यासोबत भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून आमच्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा क्षण आहे. नारायण राणे यांची प्रशासवर असलेली पकडं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील असलेला त्याचा अभ्यास यामुळे आज देशातील जबाबदार मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे. पुढील प्रत्येक निवडणूकीत एक नंबरचा पक्ष ठेवण्याच्या दृष्टीकोनातून नारायण राणे निश्चित पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न करतील, मेहनत करतील, कारण आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास आणि ज्येष्ठत्वामध्ये राणे साहेब पहिल्या दोन ते तीन क्रमांकावर आहे. आजचा दिवस प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे.’

- Advertisement -

‘सहा वर्षानंतरच्या कॅमबॅकचे श्रेय भाजपच्या नेतृत्वाला देईल, जे काँग्रेसला बारा वर्षात समजलं नाही ते भाजपच्या नेतृत्वाला कळालं नारायण राणे यांची किंमत काय आहे, राणेंचं वजन काय आहे, राणेंचा अभ्यास काय आहे आणि अनुभव काय आहे. काँग्रेसने वारंवार शब्द देऊनही तो पूर्ण केला नाही. अवघ्या दीड वर्षात भाजपने मला आमदार केलं, मोठ्या बंधूना प्रदेशात काम करण्याची संधी मिळाली. राणे यांना मंत्रीपद दिलं आहे. कार्यकर्त्यांची जाण असणारा पक्ष म्हणून आमच्या भाजपची ओळख आहे, त्यांच्यावर आज शिकामोर्तब झाला आहे.’ असे नितेश राणे म्हणाले.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -