“राणे, राणा आणि आता राज…”; ‘RRR’ची उपमा देत छगन भुजबळांचा खोचक टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेतील मशिदींवरील भोंग्यांच्या वक्तव्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी सरकाचे नेतेमंडळी आणि मनसे नेते यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यानंतर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनसेने घेतलेल्या भूमिकेवर भाष्य केलं.

chhagan Bhujbal cm should not runs away leaving his colleagues
सहकाऱ्यांना सोडून पळणारा मुख्यमंत्री नको तर सोबत नेणारा असावा, भुजबळांचा टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेतील मशिदींवरील भोंग्यांच्या वक्तव्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी सरकाचे नेतेमंडळी आणि मनसे नेते यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यानंतर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनसेने घेतलेल्या भूमिकेवर भाष्य केलं. “राणे, राणा आणि आता हे राज…RRR हे विरोधकांनी महाविकास आघाडीविरोधात जुळवून आणलेलं दिसतंय”, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.

“दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट RRR ची उपमा छगन भुजबळ यांनी राणे, राणा आणि राज यांना दिली. राणे, राणा आणि आता हे राज…RRR हे विरोधकांनी महाविकास आघाडीविरोधात जुळवून आणलेलं दिसतंय. तसंच, आंदोलन करण्यावर ठाम असाल तर पोलीस देखील त्यांचं काम करतील. पोलिसांनी नियमाप्रमाणे नोटीस दिल्या आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था ठेवणं हे पोलिसांचं काम आहे”, असं भुजबळ यांनी म्हटलं.

“जो जाणून बुजून कायद्याचं उल्लंघन करत असतो तर त्याचे परिणाम काय असतात हे त्यांना ठावूक असतं. त्यामुळे आपण काय करायचं आणि काय करू नये ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. शेवटी कायद्यापेक्षा कुणी मोठं नसतं”, असं म्हणत छगन भुजबळ यांनी मनसेने घेतलेल्या भूमिकेवर भाष्य केलं.

याशिवाय, “देशात एकतर महागाई वाढलीय. बेरोजगारी वाढलीय ते महत्वाचं असताना देशासाठी कोणता प्रश्न महत्वाचा आहे ते पाहायला हवं. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न कसे सोडवता येतील ते पाहणं महत्वाचं आहे. राणा दाम्पत्याला कोर्टानंही सुनावलं आहे. त्यामुळे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तर तुमच्या कामाची प्राथमिकता लोकांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीनं असायला हवी”, असा सल्ला देखील भुजबळ यांनी यावेळी देऊ केला.

मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद पोलिसांनी कारवाई केली आहे. 1 मे 2022 रोजी राज ठाकरेंनी औरंगाबमध्ये सभा घेतली होती. औरंगाबादच्या सभेला परवानगी देताना पोलिसांनी अटी घातल्या होत्या एकूण 16 अटींपैकी 12 अटींचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांना आढळले आहे. राज ठाकरेंच्या भाषणाची औरंगाबाद पोलीस आयुक्त निखील गुप्ता पडताळणी करत होते. कायदेशीर भाग तपासल्यानंतर राज ठाकरेंवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच जुन्या प्रकरणांमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना देखील नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभेमध्ये अटींचे उल्लंघन केल्या प्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटी किंवा नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येणार असा इशारा औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी दिला होता. यानंतर आता औरंगाबाद पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.


हेही वाचा – राज ठाकरेंवर अखेर गुन्हा दाखल, औरंगाबाद सभेवरुन पोलिसांची मोठी कारवाई