Homeमहाराष्ट्रRani Lanke : अहमदनगर दक्षिण मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत; निलेश लंकेंच्या पत्नीचे...

Rani Lanke : अहमदनगर दक्षिण मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत; निलेश लंकेंच्या पत्नीचे उमेदवारीबाबत सूचक वक्तव्य

Subscribe

अहमदनगर : आमदार निलेश लंके यांच्या गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर दक्षिण मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. या मतदारसंघातून भाजपाने विद्यमान खासदार सुजय विखे-पाटील यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवले, मात्र त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आमदार निलेश लंके हे अजित पवार गटाची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशातच आता निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी अहमदनगर दक्षिण मतदारसंघातली उमेदवारीबाबत संकेत दिले आहे. (Rani Lanke Ahmednagar South constituency in discussion once again Indicative statement of Nilesh Lankas wife regarding candidacy)

हेही वाचा – Bhosari Plot Misappropriation Case : एकनाथ खडसेंना दिलासा; पत्नीसह जावयाला जामीन

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे निलेश लंके हे आमदार आहेत. 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसमधून ते आमदार म्हणून निवडून आले. मात्र राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर त्यांनी शरद पवारांची साथ सोडत सध्याचे उपमुख्यंत्री असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर आता निलेश लंके हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे बोलले जात आहे. परंतु महायुतीतील जागावाटपानुसार ही जागा भाजपाच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे महायुतीत त्यांना उमेदवारी मिळणे आता शक्य नाही.

हेही वाचा – Arvind Kejriwal Arrested : भाजपा घाबरलीय, आज ही परिस्थिती असेल तर…; आत्या-भाच्याचे सरकारवर टीकास्त्र

निलेश लंके यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळेते अजित पवार यांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश करतील आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून यंदाची लोकसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आपल्या आमदारकीला तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून निलेश लंके हे आपल्या पत्नीसाठी या मतदारसंघातून इच्छुक असल्याचेही बोलले जात आहे. अशातच आता निलेश लंके यांच्या पत्नी रामी लंके यांनी म्हटले की, मी किंवा निलेश लंके या दोघांपैकी एकजण या मतदारसंघातून नक्की उभा राहणार आहे. राणी लंके यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यामुळे आता पुढील काही दिवसात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके उभे राहणार की त्यांच्या पत्नी हे चित्र स्पष्ट होणार आहे.