घरमहाराष्ट्रराहुल गांधींविरोधातील मनसेच्या भूमिकेचे रणजित सावरकरांकडून कौतुक

राहुल गांधींविरोधातील मनसेच्या भूमिकेचे रणजित सावरकरांकडून कौतुक

Subscribe

राज ठाकरे यांना या सर्व विषयांवर जे बोलायचे आहे ते काल त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन आणि निषेध करून दाखवून दिले

राहुल गांधी (rahul gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात जे वक्तव्य केले त्याचा सर्वांकडूनच निषेध करण्यात येत आहे. मनसे, भाजप आणि शिंदे गट यांनी सुद्धा राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. अशातच सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली. या भेटीनंतर रणजित सावरकर (rabjit savarkar) यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी रणजित सावरकर म्हणाले, राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात जी आंदोलने करण्यात आली. त्यातील सर्वात महत्वाचे आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले. मनसेच्या कार्यकर्त्यांना अडविण्यात आले पण तरीही मनसेचे कार्यकर्त्ते थेट शेगाव (shegaon) मध्ये गेले आणि राहुल गांधींची (rahul gandhi) सभा सुरु असताना त्यांनी निषेधाचे झेंडे फडकवले आणि यासाठीच मी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी शिवतीर्थावर आलो होतो याच विषयावर आमची चर्चा झाली,असे रणजित सावरकर म्हणाले.

- Advertisement -

राज ठाकरे (raj thackeray) यांना या सर्व विषयांवर जे बोलायचे आहे ते काल त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन आणि निषेध करून दाखवून दिले, असेही रणजित रावरकर म्हणाले. यावेळी संजय राऊतांवर मी नंतर बोलतो असं म्हणत रणजित सावरकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल देत मी फक्त राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी त्यांची भेट घेतली असे रणजित रावरकर म्हणाले.

राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेत आहेत. 2024 च्या निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन राहुल गांधी देशभर भारत जोडो यात्रेच्या (bharat jodo yatra) माध्यमातून पक्षबांधणी करत आहेत. 2024 च्या निवडणूका काँग्रेससाठी अत्यंतिक महत्वाच्या आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – जेल आहे की मसाज पार्लर? ‘आप’च्या नेत्याला जेलमध्ये मिळतेय VIP ट्रीटमेंट

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -