घरमहाराष्ट्रVIDEO: ...अन भर सभेत चूक; रणजितसिंह पाटलांनी मागितलं घड्याळासाठी मत

VIDEO: …अन भर सभेत चूक; रणजितसिंह पाटलांनी मागितलं घड्याळासाठी मत

Subscribe

भाषणाच्या ओघामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मतदारांना येत्या २३ एप्रिल रोजी घड्याळाला मत द्या असे म्हटले. मात्र चूक लक्षात येता त्यांनी चक्क हात जोडले आणि उपस्थितांची माफी मागितली.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांच्या सहवासात राहिलेल्या रणजितसिंह मोहिते-पाटलांचे घडाळ्यावरील प्रेम काही कमी झालेले दिसत नाही. रणजितसिंह यांच्या जिभेला ‘घड्याळ’ या शब्दाची इतकी सवय लागली की, भर प्रचार सभेत त्यांनी लोकांना घड्याळाला मत देण्याचे आवाहन केले. चूक लक्षात येताच त्यांनी उपस्थित लोकांची माफी मागितली.

रणजितसिंह मोहिते पाटील शरिराने भाजपमध्ये, मनाने राष्ट्रवादीतच… बघा हा व्हिडिओ | #MyMahanagar

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 14, 2019

- Advertisement -

अशी झाली रणजितसिंह मोहिते-पाटलांची चूक

रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे राष्ट्रवादीवर असणारे प्रेम शनिवारच्या प्रचार सभेमध्ये दिसून आले. शनिवारी माढ्याचे भाजप-सेना युतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारसभेसाठी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगोला येथे सभा घेतली. या सभेत भाषणा दरम्यान रणजितसिंह पाटील यांची बोलण्याच्या ओघात चूक झाली. भाषणाच्या ओघामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मतदारांना येत्या २३ एप्रिल रोजी घड्याळाला मत द्या असे म्हटले. मात्र चूक लक्षात येता त्यांनी चक्क हात जोडले आणि उपस्थितांची माफी मागितली. रणजितसिंह मोहिते पाटील यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय म्हणाले रणजितसिंह मोहिते-पाटील?

प्रचारात बोलताना रणजितसिंह पाटील म्हणाले की, आपल्या पाण्याला ज्यांनी विरोध केला त्यांना आपण विरोध केलाच पाहिजे. ज्यांनी आपल्या पाण्याला पाठिंबा दिला आहे, जे भविष्यात आपल्या पाण्याचा प्रश्न सोडवणार आहेत अशांच्या मागे आपण उभं राहिले पाहिजे. त्यामुळे येत्या २३ एप्रिल रोजी आपलं घड्याळं हे चिन्ह अशी चूक केली. मात्र ही चूक लक्षात रणजितसिंह मोहिते पाटलांनी हात जोडले असा हा व्हिडीओ आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर टीकेची झोड

गेल्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपचे कमळ हाती घेतले होते. भाजपामध्ये प्रवेश करुन देखील रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेसवरील प्रेम काही कमी झालेले नाही. ते अजूनही भाजपमध्ये तेवढे रुळलेले दिसत नाहीत. त्याचा प्रत्यय त्यांच्या सांगोल्यातील सभेमधील भाषणातून आला आहे. रणजितसिंहांची ही चूक उपस्थितांमध्ये हशा पिकवून गेली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर जोरदार टीका होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -