शिवबंधन बांधायचे तर राजेंना राऊतांची सेफ जागा द्या – रावसाहेब दानवे

Raosaheb Danve criticizes Shiv Sena over Sambhaji Raje's candidature
Raosaheb Danve criticizes Shiv Sena over Sambhaji Raje's candidature

राज्यसभेवर जायचे असेल तर हातात शिवबंधन बाधा, अशी ऑफर शिवसेनेकडून स्वराज संघटनेचे नेते संभाजीराजे छत्रपती यांना देण्यात आली आहे. त्याला संभाजीराजे छत्रपती यांनी नकार दिला आहे. यावर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी संभाजीराजेंच्या उमेदवारीवर भाष्य केले आहे. यात त्यांनी संभाजीराजेंना राऊतांना पाठवा, अशी मागणी करून शिवसेनेची कोंडी केली आहे.

राजेंना फर्स्ट जागा द्या –

शिवसेनेला शिवबंधन बांधलेला माणूस लागतो. शिवबंधन बांधायचे आणि अडकवून टाकायचे हे त्यामागचे सूत्रं आहे. मग काय करायचे तो निर्णय करायचा. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. सर्व पक्षांचा पाठिंबा असावा असे संभाजी राजेंना वाटते. मात्र, शिवसेनेचे म्हणणे की शिवबंधन बांधा. एकदा शिवबंधन बांधले की अडकून टाकायचे. मग राजे निवडून येवो की न येवो. राजेंना शिवबंधन बांधायचे तर जी राऊतांची सेफ जागा आहे, ती त्यांना द्या. सहाव्या जागेवर राऊतांना पाठवा. संभाजी राजेंना अडकवायचे नसेल तर हे कराच. त्यांना राज्यसभेवर सन्मानपूर्वक त्यांना पाठवायचे असेल तर त्यांना फर्स्ट जागा द्या. तरच त्यांचा सन्मान होईल, असे रावसाहेब दानवे म्हणाले.

त्यांना सन्मानाने पद दिले –

भाजपने राज्यसभेच्या सहाव्या जागेचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. संसदीय समितीच्या बैठकीत हा निर्णय होईल. संभाजीराजे आणि शिवसेनेची काय चर्चा झाली माहीत नाही. शिवबंधन बांधावे, मगच सपोर्ट करू असे पेपरमधून वाचले. ते संभाजीराजे आहेत. त्यांना उमेदवारी देताना भाजपच्या काळातही हाच विचार होता. पण तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निरोप आला होता. ते राजे आहेत. त्यांना सन्मानाने पद दिले पाहिजे. त्यांना कोणत्याही निवडणुकीत उतरवायचे नाही, असे मोदींना आम्हाला सांगितले. त्यामुळे त्यांना आम्ही राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवले होते, असे रावसाहेब दानवे म्हणाले.