Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी काँग्रेसमध्ये शरद पवारांना येण्याबाबत थोरातांचे आवाहन हास्यास्पद, रावसाहेब दानवेंची टीका

काँग्रेसमध्ये शरद पवारांना येण्याबाबत थोरातांचे आवाहन हास्यास्पद, रावसाहेब दानवेंची टीका

काँग्रेसची माडी कोसळू नये यासाठी शरद पवार यांनी बाहेरून टेकू दिला आहे - रावसाहेब दानवे

Related Story

- Advertisement -

काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशमधील जमीनदारासारखी झाली असल्याची टीका राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. पवारांच्या आरोपानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका न करता काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे असे आवाहन केलं होते. परंतु थोरात यांचे आवाहन हास्यास्पद असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. काँग्रेसची मोडकळीस आलेली हवेली कधीही कोसळू शकते मात्र ती कोसळू नये यासाठी शरद पवार यांनी त्या माडीला टेकू दिला आहे अशी खिल्ली केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. शरद पवार यांनी काँग्रेसवर टीका केली होती या टीकेवरुन विरोधकांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसची अवस्था बिकट झाली असल्याचे दानवेंनी म्हटलं आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. दानवेंनी म्हटलं आहे की, शरद पवार अनेक वर्षे त्या माडीत राहिले आहेत. कुठला खांब मोडकळीस आला आहे. कोणत्या कोपऱ्यात काय गाढून ठेवलं आहे. हे शरद पवार यांना चांगलं माहिती आहे. ते आज बोलले आहेत परंतु त्यांच्या लक्षात खुप आधी आल्यामुळे त्यांनी मोडकळीस आलेली माडी यापुर्वीच सोडून दिली. आणि बाहेर पडले आहेत तरीही बाहेरून माडी पडणार नाही यासाठी शरद पवार यांनी टेकू दिला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना काँग्रेसमध्ये येण्याचे आवाहन केलं असून ही हास्यास्पद गोष्ट असल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसकडून आपल्याच नेत्यांवर कारवाई

- Advertisement -

काँग्रेस सत्तेत असताना स्वतःच्या नेत्यांवर यंत्रणांद्वारे कारवाई केली असल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर यंत्रणांद्वारे कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यावर दानवेंनी यंत्रणा या स्वतंत्र असल्याचे म्हटलं आहे. ईडी आणि सीबीआय ही काँग्रेसची देण आहे. काँग्रेसच्या काळात लालू प्रसाद यादव, अशोक चव्हाण यांची चौकशी केली होती. यंत्रणांना तक्रारी मिळतात त्यानुसार ते कारवाई करतात असे रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

थोरात काय म्हणाले होते?

काँग्रेसची अवस्था जमीनदारी गेलेल्या जमीनदारासारखी झाली आहे. असे शरद पवार यांनी म्हटले असून त्यांच्या विधानाशी मी असहमत आहे. पवारांच्या वक्तव्याचा काँग्रेसवर काही परिणाम होणार नाही. विरोधकांनी त्यांच्या वक्तव्यावर राजकीय फायद्यासाठी टीका केली तरी काँग्रेसचे त्याच्यामुळे नुकसान होणार नाही. त्यांनी टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या विचाराचे जे लोकं आहेत त्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे आणि लोकशाही व राज्यघटना टिकवण्यासाठी सोबत लढाव असे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी करत राष्ट्रवादीला आवाहन केलं आहे.


- Advertisement -

हेही वाचा :  ठाकरे सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक संवेदनशील, संजय राऊत यांचे वक्तव्य


 

- Advertisement -