घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगररावसाहेब दानवेंच्या जावयाचा बीआरएसमध्ये प्रवेश; तिसऱ्यांदा केले पक्षांतर

रावसाहेब दानवेंच्या जावयाचा बीआरएसमध्ये प्रवेश; तिसऱ्यांदा केले पक्षांतर

Subscribe

नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारे कन्नड विधानसभेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे पुन्हा एकदा खूप महिन्यांनी चर्चेत आले आहेत. त्यांच्या एका नव्या पक्ष प्रवेशामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचे जावई असलेले आणि कन्नड विधानसभेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे नेहमीच आपल्या कृतीतून चर्चेत येत असतात. सासऱ्यांच्या विरोधात गेल्याने आणि त्यांच्यावर उघडपणे टीका केल्याने ते कायमच चर्चेत राहिलेले आहेत. आता पुन्हा एकदा अनेक महिन्यांनी जाधव चर्चेत आलेले आहेत. आज गुरुवारी (ता. २३ मार्च) हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. हैद्राबाद येथे जाऊन जाधव यांनी पक्ष प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी मनसेतून आपल्या राजकारणाला सुरुवात केली होती. ते कन्नड विधानसभेतून आमदार राहिलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असताना ते आमदार पदी निवडून आले होते. अनेकदा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून देखील ते चर्चेत राहिलेले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांना मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले होते. याचा फटका हा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना बसल्याने त्या लोकसभा निवडणुकीत खैरेंचा परभाव झाल्याचे बोलले जाते.

- Advertisement -

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्याने छत्रपती संभाजी नगरच्या राजकारणात अनेक महत्वपूर्ण बदल घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच लवकरच चंद्रशेखर राव यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा होणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

महत्वाची बाब म्हणजे हर्षवर्धन जाधव यांनी तिसऱ्यांदा हा पक्षप्रवेश केलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला रामराम केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तिथे देखील ते फार काळ थांबून राहिले नाही. यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत स्वतःचा शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्थापन केला. या पक्षामधून त्यांनी लोकसभा निवडणूक देखील लढवली. मात्र तेव्हा त्यांचा पराभव झाला. तर आता त्यांनी थेट बीआरएस पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय दर्जा’चा आयोगाकडून फेरविचार; तृणमूल-भाकप-बसपलाही नोटीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -